ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

आईच्या कुशीत परतली चिमुरडी:1600 सीसीटीव्हींच्या मदतीने अपहरणाचा कट उघड; नेमकी कशी घडली घटना, वाचा..

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


एका ३ महिन्यांच्या चिमुरडीचे अपहरण करून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या टोळीला मुंब्रा पोलिसांनी अत्यंत कौशल्याने बेड्या ठोकल्या आहेत. तब्बल १६०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी आणि अहोरात्र घेतलेल्या कष्टांनंतर, अपहरण झालेल्या बालिकेची अकोला जिल्ह्यातून सुखरूप सुटका करण्यात आली आहे. या कारवाईमुळे मुंब्रा पोलिसांच्या चिकाटीचे सर्वत्र कौतुक होत आहे. सलग ६ दिवस दररोज १६ ते १८ तास काम करून पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणला आहे. नेमकी घटना कशी घडली? २२ जानेवारी २०२६ रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास, मुंब्रा येथील खाडीमशीन रोडवर ही घटना घडली. फिर्यादी फरजाना मन्सुरी या आपल्या दोन मुलींना घेऊन रस्ता ओलांडत असताना, एका अनोळखी महिलेने ‘मदत करण्याच्या’ बहाण्याने त्यांच्या ३ महिन्यांच्या मुलीला (आफिया) कडेवर घेतले. गर्दीचा फायदा घेत त्या महिलेने बाळासह तिथून पळ काढला. याप्रकरणी मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी महिलेने अनेकदा कपडेही बदलले ठाण्याचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे म्हणाले, आरोपी महिलेने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी मुंब्रा ते ठाणे प्रवासादरम्यान अनेकदा आपले कपडे, नकाब आणि बाळाचे पांघरूण बदलले होते. एका रिक्षाचालकाचा माग काढत आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी प्रथम नसरीन इकलाख शेख या महिलेला ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले आहे. पोलिसांनी वापरली आधुनिक कार्यपद्धती लहान मुलांच्या अपहरणाच्या केसेसमध्ये वेळेला अत्यंत महत्त्व असते. जितका उशीर होईल, तितकी बाळ परराज्यात किंवा मानवी तस्करीच्या जाळ्यात जाण्याची शक्यता जास्त असते. पोलिसांनी वेळेत हालचाल करून हे रोखले. या गुन्ह्यात पोलिसांनी तांत्रिक तपास आणि मानवी बुद्धिमत्ता यांचा अचूक संगम साधला. आरोपींनी वारंवार वेशांतर करून आणि रेल्वे स्थानकांवर छुप्या मार्गांचा वापर करून पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी केवळ सीसीटीव्ही फुटेजवर अवलंबून न राहता, बाळाच्या पायातील सॉक्स सारख्या सूक्ष्म खुणांवरून आरोपींचा माग काढला. १६०० कॅमेऱ्यांचे विश्लेषण, गुप्त बातमीदारांचे जाळे आणि अकोल्यापर्यंतचा वेगवान पाठलाग यामुळे अवघ्या ६ दिवसांत चिमुरडीची सुखरूप सुटका झाली. हा तपास पोलिसांच्या चिकाटीचे आणि आधुनिक कार्यपद्धतीचे उत्तम उदाहरण आहे. अकोल्याच्या पातूर तालुक्यातील खेटरीत बाळ नसरीनच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली. हे बाळ अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील खेटरी गावात असल्याचे निष्पन्न झाले. मुंब्रा पोलिसांनी तातडीने तिथे पोहोचून आरोपी मोहम्मद मुजीब गुलाब (३१ वर्षे) आणि त्याची पत्नी खैरुन्निसा (३०) यांना ताब्यात घेतले. अपहरण झालेली ३ महिन्यांची आफिया सुखरूप असून तिला तिच्या आईच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर