ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

देश संकटात आणि पंतप्रधान प्रचारात व्यस्त:मोदींना जगात मान उरलेला नाही, गृहखाते केवळ फोडाफोडीत मग्न, मुंबई सुरक्षित नाही- संजय राऊत

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या केरळमध्ये, तामिळनाडूमध्ये निवडणुकीचा प्रचार करत आहेत. देशात जो गंभीर प्रसंग ओढवला आहे, पेट्रोल, डिझेल, तेल संकट LPG चा तुटवडा यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वक्तव्य केले नाही. हे केवळ निवडणुकीसाठी निवडणुका जिंकण्यासाठी सरकारी तिजोरीतून अमाप खर्च करत आहेत. हे संवेदनशुन्य पंतप्रधान आम्हाला लाभले हे देशाचे दुर्दैव आहे, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, नागरिकांनी सिलिंडर नाही म्हणून काही घाबरण्याची गरज नाही. भाजपचा जो जय श्री राम मंत्र आहे तो म्हणायचा आणि लगेच घरी सिलिंडर येतील. नमो-नमो म्हटले की सिलिंडर घरपोच येतील. पेट्रोल-डिझेलसुद्धा तुमच्या दारात येईल. इतक्या स्तरावर आपल्या देशात अंधभक्ती आहे. प्रमुख प्रश्नांची चिंता कुणाला वाटत नाही. पंतप्रधान कुणाच्यातरी दबावाखाली संजय राऊत म्हणाले की, आपल्या देशाचे काही परराष्ट्र धोरण नाही. नरेंद्र मोदी यांना जगामध्ये कोणताही मान आणि प्रतिष्ठा राहिलेली नाही. एकेकाळी जगामध्ये भारताच्या भूमिकेला फार महत्त्व होते, पण मोदी आल्यापासून जगात ते महत्त्व राहिले नाही. इरान युद्धाबद्दल भारताची भूमिका असायला हवी होती. पण युद्धाच्या एक दिवस आधी मोदी इस्रायलला जातात आणि त्यानंतर काही तासांमध्ये इराणच्या नेत्याची हत्या केली जाते त्यावर साधा निषेध नोंदवला जात नाही. म्हणजे कुणीतरी पंतप्रधान कुणाच्यातरी दबावाखाली आहेत. मोदींनी निवडणूक जिंकणे महत्त्वाचे संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला ही खूप मोठी समस्या आहे असे वाटत नाही. त्यांना आसाम, केरळ, तामिळनाडूमध्ये निवडणूक जिंकणे महत्त्वाचे वाटत आहे. LPG चा तुटवडा,हॉटेल बंद होतायत याबाबत चिंता नाही, हे बंद पडत असल्याने वाढणारी बेरोजगारी याबद्दल सरकारला काहीही चिंता नाहीच. मुंबई सुरक्षित नाही संजय राऊत म्हणाले की, विधीमंडळात बॉम्बची अफवा हे गृहमंत्र्यांसाठी आव्हान आहे. मुंबई सुरक्षित नाही असा याचा अर्थ आहे. महाराष्ट्राचे गृहखाते, पोलिस दल हे केवळ विरोधकांमध्ये फोडाफोडी करण्यासाठी आणि दहशत निर्माण करण्यासाठी वापरले जात आहे. यामुळे गुन्हेगारांचा दहशतवाद्यांना असे वाटत आहे की आपण काहीही केले तरी पोलिसांचे हात आपल्यापर्यंत पोहोचणार नाही. ही केवळ अफवाच ठरावी. आमदार तिथे असताना अशा अफवा पसरू नये. संसदेवर हल्ला झाला तेव्हाही भाजप सरकार होते, ते आम्ही डोळ्यांनी पाहिले आहे. हे दुर्दैवाने सांगावे लागत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर