ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

बुलढाण्यात 4 चिमुकल्यांना विहिरीत फेकून पित्याने उडी घेऊन केली आत्महत्या:कौटुंबिक वादातून टोकाचे पाऊल; चिमुकल्यांमध्ये दोन मुलींचा समावेश

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


कौटुंबिक वादातून जन्मदात्याने आपल्या चार निष्पाप मुला – मुलींना विहिरीत फेकून दिले आणि त्यानंतर स्वतः विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. जळगाव जामोद (जि. बुलढाणा) तालुक्यातील आदिवासी भागातील राजुरा शिवारात सोमवारी २५ मे रोजी सकाळी ही हृदयद्रावक घटना उघडकीस आली. या घटनेत पित्यासह दोन मुले आणि दोन मुली अशा एकूण पाच जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. विजय मुसा किराडिया (२७, रा. राजुरा, ग्रामपंचायत उमापूर) असे मुलांना विहिरीत फेकून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलणाऱ्या पित्याचे नाव आहे. विजय आणि त्यांच्या पत्नीत तीव्र भांडण झाले होते. विजय यांनी रविवारी, २४ मे रोजी पत्नीला माहेरी सोडले. त्यानंतर तेथून परतल्यानंतर मध्यरात्री विजय यांनी आपली मुले प्रित (७), प्राची (५), पूर्वी (३) आणि अवघ्या दोन वर्षांचा पीयूष या चौघांनाही विहिरीत टाकले. त्यानंतर त्यांनी स्वतः विहिरीत उडी घेतली. सोमवारी सकाळी काही ग्रामस्थांना विहिरीत तीन मृतदेह तरंगताना दिसले. ग्रामस्थांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार जळगाव जामोद पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली. त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीतील पाचही मृतदेह विहिरीबाहेर काढले. पित्यासह चार निरागस मुलांचे मृतदेह पाहून सर्व सुन्न झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून पोलिसांनी पाचही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर