ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

नीलम गोऱ्हे यांनी निवडणुकीची तिकिटे कमर्शियल पद्धतीने दिले:भाजप जे सांगेल तेच काम काही नेते करतात; पक्षांतर्गत अस्वस्थता उघड

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना एकत्रित युतीत निवडणूक लढवणार असल्याचं जवळपास निश्चित झालं असलं, तरी जागावाटपाचा प्रश्न मात्र अजूनही सुटलेला नाही. या पार्श्वभूमीवर पुण्यात राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. शिवसेना शिंदे गटाकडून 20 ते 25 जागांची मागणी करण्यात आली असून, एवढ्या जागा देण्यास भाजप तयार नसल्याची माहिती समोर येत आहे. याच नाराजीचा उद्रेक मंगळवारी उघडपणे पाहायला मिळाला. शिवसेनेचे काही इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्ते थेट शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांच्या निवासस्थानाबाहेर जमा झाले आणि जोरदार घोषणाबाजी करत त्यांनी आंदोलन छेडलं. या आंदोलनादरम्यान शिवसेनेच्या नेतृत्वावर गंभीर आरोप करण्यात आल्याने पक्षांतर्गत अस्वस्थता उघड झाली आहे. भाजप-शिवसेना युतीबाबत चर्चा सुरू असतानाच, जागावाटपात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत अनेक इच्छुक उमेदवार आपल्या समर्थकांसह नीलम गोऱ्हे यांच्या घराबाहेर जमले होते. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या घोषणांमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. पुणे महापालिकेत भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार असल्याची चर्चा सुरू असली, तरी प्रत्यक्षात दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपावर एकमत होत नसल्याने शिवसेनेचे स्थानिक कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवार अस्वस्थ असल्याचं स्पष्ट दिसत आहे. युती आहे, पण शिवसेनेला न्याय नाही, अशी भावना आंदोलनकर्त्यांच्या घोषणांतून व्यक्त होत होती. आंदोलनादरम्यान इच्छुक उमेदवारांनी आणि कार्यकर्त्यांनी थेट पक्षाच्या निर्णय प्रक्रियेवर बोट ठेवलं. काही शिवसैनिकांनी सांगितलं की, पक्षासाठी पाच-पाच वर्ष प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे अहवाल तयार करून नेत्यांकडे दिले जातात, मात्र ते अहवाल पाहिलेही जात नाहीत. 500 ते 700 इच्छुक उमेदवारांनी फॉर्म भरले असून, त्यामधील बहुतांश कार्यकर्त्यांनी तळागाळात मेहनत घेतलेली आहे. तरीही अहवाल न पाहता बाजूला ठेवले जात असल्याचा आरोप करण्यात आला. काही कार्यकर्त्यांनी शिवतारे बापू यांच्यावरही अप्रत्यक्षपणे टीका करत, ते ग्रामीण भागातील नेते आहेत, त्यांना पुणे शहरातील राजकारण आणि परिस्थितीची माहिती नाही, असा आरोप केला. आमच्या भागात भाजपचे चार उमेदवार आहेत, त्यामुळे तुमचं काही होणार नाही, असं थेट सांगितलं जात असल्याचा दावाही यावेळी करण्यात आला. या आंदोलनात आणखी गंभीर आरोप पुढे आले. भाजपच्या सांगण्यावरूनच शिवसेनेचे निर्णय होत असल्याचा आरोप करत, शिवसेनेला ताकद दिली जातेय की खच्चीकरण केलं जातंय? असा थेट सवाल इच्छुक उमेदवारांनी उपस्थित केला. काही कार्यकर्त्यांनी सांगितलं की, एकनाथ शिंदे यांची पुण्यातील शिवसेना हळूहळू कमकुवत केली जात आहे. आमची नाराजी ही आजची नाही, तर दीर्घकाळ साचलेली खदखद आहे, ती व्यक्त करण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत, असं आंदोलनकर्त्यांनी सांगितलं. मात्र, नेते भेटायला तयार नाहीत, संवादाची कोणतीही दारे उघडी नाहीत, त्यामुळे आम्हाला रस्त्यावर उतरावं लागत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. नाराजीच्या या आंदोलनात नीलम गोऱ्हे यांच्यावर थेट आरोप करत, त्यांच्या परिसरात आजपर्यंत शिवसेनेचा नगरसेवक निवडून आलेला नाही, कारण तिथे शिवसेनेला वाढू दिलं गेलं नाही, असा आरोप करण्यात आला. शिवसेनेच्या पुण्यातील काही नेत्यांनी निवडणुकीची तिकिटं ‘कमर्शियल’ पद्धतीने देण्याचं ठरवल्याचा गंभीर आरोपही यावेळी करण्यात आला. भाजप जे सांगेल तेच ऐकण्याचं काम शिवसेनेचे काही नेते करत असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. जो प्रामाणिकपणे पक्षासाठी काम करतो, त्याला आपल्या घरासमोर पोलिस बंदोबस्त ठेवण्याची वेळ येत नाही, असा टोला लगावत, नीलम गोऱ्हेंनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी संतप्त शिवसैनिकांनी केली. पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उफाळलेली ही नाराजी भाजप-शिवसेना युतीसाठी मोठं आव्हान ठरण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे अंतिम निर्णय घेतील – नीलम गोऱ्हे

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर