ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

लोकसहभागातून वेगावच्या जिल्हा परिषद शाळेला नवे रूप

4 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव: ग्रामीण भागातील शिक्षण टिकावे, गरीब-कष्टकरी शेतकरी पालकांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे या उदात्त हेतूने मारेगाव तालुक्यातील वेगाव येथील जिल्हा परिषद शाळेला लोकसहभागातून रंगरंगोटी करून नवसंजीवनी देण्यात आली आहे.

वेगाव येथील जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षकांच्या पुढाकाराने गावातून लोकवर्गणी गोळा करून नुकतीच शाळेची रंगरंगोटी करण्यात आली. शाळा हे ज्ञानाचे मंदिर आहे; ते स्वच्छ, सुंदर व प्रेरणादायी असणे तितकेच महत्त्वाचे आहे या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.

ग्रामीण भागातील शाळा बंद पडू नयेत, विद्यार्थ्यांचे शिक्षण अखंड सुरू राहावे यासाठी जिल्हा परिषद शाळांमध्ये विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. वेगावच्या शाळेत अनुभवी, उच्चशिक्षित व विद्यार्थ्यांशी आपुलकीने वागणारा शिक्षकवर्ग, तसेच शाळा व्यवस्थापन समितीचा सक्रिय सहभाग यामुळे आजही या शाळेची पटसंख्या समाधानकारक आहे.

लोकवर्गणी गोळा करताना आजही गावकऱ्यांच्या मनात शाळेबद्दल असलेला आदर व जिव्हाळा प्रकर्षाने जाणवला. आधुनिक युगाची गरज ओळखून आदर्श गाव समितीतर्फे शाळेसाठी स्मार्ट बोर्ड उपलब्ध करून देण्यात आला असून, विद्यार्थी आता तंत्रज्ञानाधिष्ठित शिक्षणाचा लाभ घेत आहेत.

यावेळी गावातील पालकांना आवाहन करण्यात आले की, केवळ इंग्रजी माध्यमाच्या आकर्षणाला बळी न पडता, मोफत व गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आणि आपल्या मातृभाषेचा अभिमान जपण्यासाठी आपल्या पाल्यांचे प्रवेश गावातील जिल्हा परिषद शाळेतच घ्यावेत.

आपण शिकलेली शाळा टिकावी, ती अधिक सक्षम व्हावी यासाठी सर्व सजग पालकांनी पुढाकार घ्यावा, अशी विनंती शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निलेश गौरकार , मुख्याध्यापक श्री देवगडकर सर तसेच शाळा. व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य यांनी केली आहे.लोकसहभाग, शिक्षकांचे समर्पण आणि गावकऱ्यांचा विश्वास यामुळे वेगावची जिल्हा परिषद शाळा आजही ग्रामीण शिक्षणाचा आदर्श ठरत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर