ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

दुचाकी अपघातात वणीच्या माजी नगरसेवकाचा मृत्यू

3 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

झरी–घोन्सा मार्गावरील दुर्गापूरजवळील वळणावर दुर्घटना

ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी

झरी–घोन्सा मार्गावरील दुर्गापूर गावाजवळील वळणावर झालेल्या दुचाकी अपघातात वणी येथील माजी नगरसेवक राजेश वामनराव डफ रा. रंगारी पुरा वणी (वय अंदाजे ५५) यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी सुमारे तीन वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे वणी व झरी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, राजेश डफ हे झरी येथे आज सकाळी एका बैठकीसाठी आले होते. बैठक आटोपल्यानंतर ते आपल्या दुचाकी (क्रमांक MH-29 AS 1856) ने वणीच्या दिशेने निघाले होते. दरम्यान, झरी–घोन्सा मार्गावरील दुर्गापूर गावाजवळील वळणावर त्यांच्या दुचाकीचे संतुलन अचानक बिघडले.त्यामुळे दुचाकी रस्त्यालगतच्या खड्यात जाऊन कोसळली. या अपघातात त्यांच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताच्या वेळी घटनास्थळी कोणीही उपस्थित नसल्याने अपघात नेमका कशामुळे झाला, याबाबत अद्याप स्पष्टता नसून कारण गूढ आहे. काही वेळानंतर शेजारील शेतात कापूस वेचत असलेल्या महिलांच्या ही घटना निदर्शनास आली. त्यांनी तत्काळ परिसरातील नागरिकांना माहिती दिली. नागरिकांनी पोलिसांना कळवताच घटनास्थळी गर्दी झाली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. अपघाताच्या काही वेळ आधी राजेश डफ यांनी एका कार्यक्रमातील छायाचित्रे सोशल मीडियावरील स्टेटसवर टाकली होती.

काही वेळातच त्यांच्या अपघाती निधनाची बातमी समजताच मित्रमंडळी व परिचितांनी घटनास्थळी धाव घेतली.या घटनेमुळे राजकीय व सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली असून सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर