ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

मारोती गौरकार यांची काॅग्रेस पक्षाच्या मारेगाव तालुकाध्यक्षपदी फेरनिवड

98 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई, मारेगाव,

मारेगाव तालुका भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या तालुका अध्यक्षपदी मारोती गौरकार यांची दुसर्‍यांदा फेरनिवड करण्यात आली आहे. काॅग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी विद्यमान अध्यक्ष मारोती गौरकार यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना परत एकदा काॅग्रेसचे मारेगाव तालुकाध्यक्षपद बहाल केले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काॅग्रेसची व्होटबँक मजबूत करून पक्ष संघटनवाढ करण्याचे मोठे आव्हान तालुका अध्यक्ष गौरकार यांच्यासमोर असणार आहे.मारोती गौरकार यांच्या पहिल्या कारकिर्दीत अनेक सामाजिक उपक्रम तालुक्यात राबविण्यात आले होते.तसेच काँग्रेस पक्षातर्फे वेगवेगळे कार्यक्रम घेऊन पक्षवाढीसाठी मोठया प्रमाणात प्रयत्न करण्यात आले.

मारोती गौरकार यांच्या निवडीने तालुक्यातील काॅग्रेस कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून या निवडीचे श्रेय माजी आमदार वामनराव कासावर, जिल्हा अध्यक्ष प्रफुल्ल मानकर, काॅग्रेस नेते नरेंद्र पाटील ठाकरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गौरीशंकर खुराणा, माजी बालकल्याण सभापती अरुणा खंडाळकर यांना ते देत आहे.

दुसऱ्यांदा फेरनिवड झाल्याने त्यांनी पक्षाचे आभार मानले असून तालुका काँग्रेसमय करण्याचा प्रयत्न करू.तसेच येणाऱ्या लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणुकीमध्ये पक्षाचा झेंडा तालुक्यात रोवू असा विश्वास व्यक्त केला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर