ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

मार्डा डॅमवर घेतला चारचाकीने पेट.

84 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

पाहता पाहता झाला गाडीचा कोळसा.

सुरेश पाचभाई मारेगांव : राजुरा येथुनआपल्या नातेवाईकांना भेटायला चारचाकी घेऊन चाललेल्या गाडीने अचानक पेट घेतला आणि पाहता पाहता गाडीचा कोळसा झाला. ही घटना आज दिनांक.25 फेब्रुवारी 2023 रोज शनिवारला दुपारी 12:30 वाजताच्या सुमारास घडली.

राजुरा येथील बालाजी संभाजी लिपटे हे आपली चारचाकी रिनॉल्ट कंपनीची पल्स आर एक्स एल MH 14 – EU 1963 हिने राजुरा येथून वरोरा मार्गे मारेगाव तालुक्यातील मुकटा येथे यावयास निघाले. येत असतांना मार्डा मुकटा दरम्यान असलेल्या वर्धा नदीवरील डॅमवर यांचे चारचाकी वाहन आले असता या वाहनाने अचानक पेट घेतला.

गाडीने पेट घेतला तेव्हा गाडीमध्ये एकूण दोघे जण बसले होते. अचानक घडलेल्या या घटनेने प्रसंगावधान साधून गाडी बंद करून तात्काळ गाडीमधून बाहेर पडले. आणि समोरील अनर्थ टळला. परंतु लागलेल्या या आगीने मात्र वाहन पूर्णपणे जळून खाक झाले असून यात वाहणाचे अतोनात नुकसान झालेले आहे.

सध्या उन्हाळा सुरु झाला असून अति उष्णतेमुळे वाहनांना आग लागण्याचे प्रमाण वाढणार आहे. अशातच वाहनधारकांनी वेगावर नियंत्रण ठेऊन वाहणाची व स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर