ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

भंडारा जिल्ह्यात बोर्ड परीक्षेचा बिगुल:कॉपी अन् तणावमुक्तीसाठी प्रशासन सज्ज; ८८ केंद्रांवर १० वी, ६७ केंद्रांवर १२ वीची परीक्षा

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता १२ वीच्या परीक्षा १० फेब्रुवारी २०२६ पासून, तर इयत्ता १० वीच्या परीक्षा २० फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होत आहेत. या परीक्षा भयमुक्त आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी भंडारा जिल्हा प्रशासन आणि शिक्षण विभाग पूर्णतः सज्ज झाला आहे. “भीती नको, पण तयारी हवी” असा मोलाचा सल्ला तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना दिला आहे. जिल्ह्यातील परीक्षार्थींची आकडेवारी यावर्षी जिल्ह्यातून इयत्ता १० वीचे एकूण १५,९३५ विद्यार्थी ८८ केंद्रांवरून परीक्षा देतील. तर, इयत्ता १२ वीचे एकूण २०,३५७ परीक्षार्थी ६७ केंद्रांवरून ही परीक्षा देणार आहेत. तालुकानिहाय परीक्षा केंद्रांची आणि विद्यार्थ्यांची स्थिती कॉपीमुक्त अभियानाची वज्रमूठ जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षण विभागाने विशेष ‘कॉपीमुक्त सप्ताह’ राबवून जनजागृती केली आहे. परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार रोखण्यासाठी सहा भरारी पथके तैनात करण्यात आली असून, यामध्ये महिला अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. याशिवाय, केंद्रांवर बैठे पथक पूर्णवेळ लक्ष ठेवून असेल. संवेदनशील केंद्रांवर विशेष लक्ष जिल्ह्यात इयत्ता १० वीची ४ आणि १२ वीची ५ केंद्रे ‘उपद्रवी’ (संवेदनशील) म्हणून घोषित करण्यात आली आहेत. या केंद्रांवर कडक पोलीस बंदोबस्त तैनात असेल. जर कोणत्याही केंद्रावर गैरमार्ग आढळून आला, तर त्या केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्याचा कडक इशारा प्रशासनाने दिला आहे. विद्यार्थ्यांना आवाहन तणावमुक्त वातावरणात परीक्षा देण्यासाठी तज्ज्ञ सुलभकांद्वारे समुपदेशन उपलब्ध करून देण्यात आले आहे. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रवींद्र सोनटक्के व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) मनिषा गजभिये यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे की, “विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या काळात योग्य आहार घ्यावा, पुरेशी झोप घ्यावी आणि कोणत्याही दडपणाशिवाय पारदर्शकपणे परीक्षा द्यावी.”

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर