ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

अजित पवारांच्या अपघातानंतर विमान कंपनीवर गंभीर आरोप:VSR Aviation सराईत गुन्हेगार, दुसरे प्लेन क्रॅश झाल्याचा दावा, वाचा…

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी विमान अपघातात निधन झाले. मुंबईवरून बारामती येथे येत असताना बारामती विमानतळावार लँडिंगच्यावेळीच अजित पवारांच्या विमानाला भीषण अपघात झाला. त्यात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आज सकाळी विमान अपघातात निधन झाल्याने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. मुंबई येथून बारामती येथे येत असताना बारामती विमानतळावर लॅंडींग करत असतानाच विमानाला भीषण अपघात झाला आणि यात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या विमान अपघातानंतर आता हे विमान ज्या कंपनीचे आहे, त्या कंपनीवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. लॅंडींग करायला अवघे काही मिनिट शिल्लक असताना हा अपघात झाल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. यावर वरिष्ठ पत्रकार सुहेल सेठ यांनी ट्विट करत VSR कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत. सुहेल सेठ आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, आज सकाळी जो विमान अपघात झाला ते विमान VSR Aviation च्या मालकीचे होते. ते सराईत गुन्हेगार आहेत. त्यांचे हे दुसरे विमान क्रॅश झाले आहे. पिता-पुत्र ही कंपनी चालवतात. ते लोकांना DGCAIndia हे आमच्या खिशात आहे असे लोकांना सांगत फिरत असतात. ही चार्टर कंपनी बंद केली पाहिजे, असे सेठ यांनी म्हटले आहे. सुहेल सेठ यांच्यानंतर तेहसीन पुनावाला यांनी देखील ट्विट केले आहे. त्यांनी म्हटले की, अजित पवार ज्या विमानातून प्रवास करत होते. ते विमान VSR Aviation चे होते. हे त्या कंपनीचे दुसरे विमान क्रॅश झाले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये भारतात अनेक विमाने आणि हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहेत. DGCA ने आता तरी यात लक्ष घालून कडक पावलं उचालावीत. ओम शांती! दरम्यान, या अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यात अजित पवार, मुंबई पीएसओ HC विदीप जाधव, पायलट कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन संभवी पाठक, फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांचा समावेश होता. 2023 सालीही झाला होता असाच अपघात 14 सप्टेंबर 2023 रोजी मुंबई विमानतळावर VSR Ventures Learjet 45 aircraft VT-DBL हे खासगी विमान कोसळले होते. खराब हवामानामुळे हा अपघात झाल्याचा दावा त्यावेळी करण्यात आला होता. या अपघातात प्रवास करणाऱ्यांपैकी तीन जण जखमी झाले होते. हा अपघात देखील लॅंडींग करत असताना काही मिनिटे पूर्वीच झाला होता. या अपघातानंतर विमानाचे दोन तुकडेच झाले होते. 2023 मधील विमान अपघाताचा व्हिडिओ दरम्यान, अजित पवार देखील याच कंपनीच्या विमानाने प्रवास करत होते. हा अपघात देखील लॅंडींग करण्यापूर्वी अवघ्या काही मिनिटांपूर्वी झाला आहे. यावरून पत्रकार सुहेल सेठ यांनी या कंपनीवर बोट ठेवले आहे. तसेच या संदर्भात सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर