ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

ठाकरे गटाचा अजेंडा द्वेषाचा अन् औरंगजेबाचा:बांगलादेशी घुसखोरांविरोधात भूमिका घेताच संजय राऊतांचे पोट दुखते – भाजप

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


जनाब संजय राऊत भाजपचा झेंडा हा हिंदूत्ववादाचा आणि मराठी असल्याने जनतेला आम्हाला स्वीकारले आणि आम्ही मराठी महापौर केला. तुमचा झेंडा हिंदूत्वाच्या विरोधात आणि अजेंडा औरंगजेब आणि अफजल खानाचा होता म्हणून मुंबईकरांनी तुम्हाला नाकारले आहे, असे भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, उबाठाच्या हिरव्या अजेंडाला नाकारण्याचे काम जनतेने केले आहे. भाजप कायमच मुंबईत हिंदू आणि मराठी महापौर होणार हे सांगत होती. आणि आम्ही दिलेला शब्द पाळला. तुम्हाला पाकिस्तान आणि बांगलादेशधार्जिणा महापौर करायचा होता. तुमचा झेंडा द्वेषाचा अन् अजेंडा औरंगजेबाचा आहे हे मुंबईकरांनी ओळखले आहे. रितू तावडे या भाजपच्या कार्यकर्ता आहेत त्या कुठल्या पक्षातून आल्या ते सांगण्यापेक्षा संजय राऊत तु्म्ही कुठल्या पक्षातून आलात याचा विचार करा. तुम्ही किती वैचारिक सुंता झालेले आहात हे महाराष्ट्राला ठाऊक आहे. राऊतांच्या पोटात दुखायला लागले नवनाथ बन म्हणाले की, मुंबईतील बांगलादेशी घुसखोराच्याविरोधात रितू तावडे यांनी भूमिका घेतल्यानंतर लगेच संजय राऊत यांच्या पोटात दुखायला लागले. बांगलादेशींना बोहर काढू म्हटल्यावर राऊतांना एवढी अडचण का होते. तुम्हाला त्यांचा पुळका का येत आहे, त्यांच्या जीवावर मनपा जिंकायची हे तुमचे धोरण होते ते मुंबईकरांनी ओळखले आणि तुम्हाला घरी बसवले. त्यांना आम्ही मुंबईच्या बाहेर काढण्याचे काम करत आहोत. आमच्याकडून त्यांना एकही रुपया दिला जात नाही. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि मुंबई मनपा बांगलादेशी घुसखोरांना बाहेर काढतो आहोत. तुम्हाला त्यांच्या जीवावर सत्ता स्थापन करायची आहे. उबाठाची हिंदूविरोधी भूमिका नवनाथ बन म्हणाले की, हिंदू मंदिरांची तुम्हाला कधी पासून चिंता लागायला लागली असा सवाल राऊतांना केला आहे. काही दिवसांपासून तुम्ही आजान स्पर्धा, नमाज पठण करणे, हिंदूविरोधी भूमिका घेणे, देशविरोधी पाकिस्तानधार्जिणी भूमिका घेण्याचे काम उबाठाकडून सुरू आहे. पण आम्ही बांगलादेशी घुसखोरांना बाहेर काढण्याचे काम करणार आहोत. संघात हिंदू-मुस्लिम नाही नवनाथ बन म्हणाले की, आरएसएसच्या कार्यक्रमात देशभक्तांचे स्वागत असते तिथे हिंदू-मुस्लीम द्वेष करत नाही. जे राष्ट्रसाठी काम करत असतात त्यांचे तिथे स्वागत करण्यात येते. राऊत बांडगे झाले आहात.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर