ब्रेकिंग न्यूज
लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक IND vs WI : भारताविरुद्ध वेस्ट इंडिजची टीम जाहीर! 3 खुंखार खेळाडू घालणार तांडव; 30 वर्षाच्या वादळी खेळाडूचा… घराला एकच दरवाजा, कामे आटोपून झोपली महिला, शेजाऱ्यानं मध्यरात्री पाहिलं, तर…, सांगली हादरलं! गांडूळ खत निर्मितीचा व्यवसाय केला यशस्वी, आता वर्षाला होतीये 7 लाख रुपयांची उलाढाल, सांगितला यशाचा मंत्र नागपुरात सर्वात लांब उड्डाणपूल, CM फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन, पुलाची वैशिष्ट्ये काय? VIDEO
SP News Maregaon

उद्या शहा मोदींविरोधातच बंड करू शकतात:प्रादेशिक पक्ष अन् खासदार फोडून मोदींना आव्हान देण्याचा अमित शहांचा कट- संजय राऊत

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना देशाचे पंतप्रधान व्हायचे आहे आणि त्यासाठीच शिवसेना व टीएमसी मधील खासदार फोडण्याचे मोठे षडयंत्र त्यांनी रचले आहे, असा खळबळजनक आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. महाराष्ट्रात सध्या सुरू असलेली खासदारांची फोडाफोडी याच मोठ्या कटाचा भाग असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या षडयंत्रात सामील असल्याचा दावा राऊत यांनी केला. भविष्यात स्वतः पंतप्रधान होण्यासाठी अमित शहा हे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधातच मोठे बंड पुकारू शकतात, असे राऊतांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, देशात सध्या राजकीय गोंधळ नाही, तर अमित शहा यांच्यामुळे अराजक निर्माण होण्याची परिस्थिती आहे. शहा व्यापारी आहेत; शेअर बाजारात पैसा गुंतवणे आणि कृत्रिम भाव वाढवून नफा कमावणे हाच त्यांचा मूळ व्यवसाय आहे. त्यांचे सहकार क्षेत्र हे निव्वळ ढोंग आहे. प्रादेशिक पक्ष आणि खासदार फोडून भविष्यात नरेंद्र मोदी यांनाच थेट आव्हान देण्याचे कारस्थान शहा रचत आहेत. या संपूर्ण खेळात त्यांनी एकनाथ शिंदेंनाही सोबत घेतले असून, उद्या या फुटलेल्या खासदारांच्या बळावर शहा हे मोदींविरोधात बंड करतील, असे राऊत म्हणाले. शिंदे हे शहांचे ‘टेस्ट ट्यूब बेबी’ संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे ही अमित शहा यांचे ‘टेस्ट ट्यूब बेबी’ आहे. शहा आणि शिंदेंच्या संगनमताने मोदींसमोर आव्हान उभे केले जात असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. मोदींनंतर भाजपचा कोणीही पंतप्रधान होणार नाही, असा दावाही त्यांनी केला. अमित शहा जर शिंदेंच्या गटाला खरी शिवसेना म्हणत असतील, तर त्यांना राजकारणाऐवजी शेअर बाजारात जावे लागेल. खरी शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीच आहे. हिंमत असेल तर शहा यांनी गृहमंत्रिपदाचा दबाव बाजूला ठेवून न्यायालयात यावे आणि खरी शिवसेना कोणती ते सिद्ध करावे. शहांच्या पोटातील विष ओठावर आले संजय राऊत म्हणाले की, शिंदेंच्या गटाला आता चार वर्षे झाली, तरीही सर्वोच्च न्यायालय अजून निर्णय देऊ शकलेले नाही, कारण तुमच्या सत्तेचा दबाव त्यांच्यावर आहे. तुमच्या दबावामुळेच निवडणूक आयोगाने त्यांना चिन्ह आणि नाव दिले. अमित शहा यांनी नुकत्याच केलेल्या एका विधानाचा संदर्भ देत, काल शहा यांच्या पोटातील विष ओठावर आले. त्यांनीच एकनाथ शिंदेंना ‘शिवसेनाप्रमुख’ होण्याची प्रेरणा दिली, यावरून बाळासाहेब ठाकरेंची जागा घेण्याचे कारस्थान दिल्लीतूनच शिजत असल्याचे स्पष्ट होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर