जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज देण्याचा प्रयत्न:कुठल्याही शेतकऱ्याची CIBIL साठी अडवणूक करायची नाही, CM देवेंद्र फडणवीसांचे बँकांना आदेश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात बैठक पार पडली. या बैठकीत अनेक शेतकऱ्यांच्या तसेच शेतीच्या अनेक विषयांवर चर्चा करण्यात आल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे. तसेच जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्जमाफी कर्ज कसे मिळू शकेल यावर विशेष भर दिल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच कोणत्याही शेतकऱ्याची सीबीलसाठी अडवणूक करायची नाही, असे आदेशही त्यांनी बँकांना दिले आहेत. देवेंद्र फडणवीस म्हणाले, एचएसबीसीच्या बैठकीत एकूण कर्ज वाटपाच्या संदर्भात चर्चा झाली आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज कसे मिळू शकेल या संदर्भात तजवीज करण्यात आली. विशेषतः असे लक्षात आले की, साधारणपणे आपल्या ज्या जिल्हा सहकारी बँक आहेत आणि ग्रामीण बँक, या मिळून 67 टक्के शेतकऱ्यांना कर्ज दिले जाते आणि राष्ट्रीयकृत बँका या 26 टक्के शेतकऱ्यांना फक्त कर्ज देतात. सीबीलसाठी कुठल्याही शेतकऱ्याची अडवणूक करायची नाही पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, डीसीसीचे जे काही टार्गेट अचिव्हमेंट आहे ते 80 टक्क्यांच्या वर आहे. मात्र राष्ट्रीयकृत बँकांचे मात्र 67 टक्के आहे. त्यामुळे आज अतिशय कडक शब्दांत राष्ट्रीयकृत बँकांना असे सांगण्यात आले आहे की त्यांनी 80 टक्क्यांच्या वर टार्गेट पूर्ण केले पाहिजे. दुसरे त्यांना हे सांगण्यात आले आहे की सीबीलची मागणी केली जाऊ नये. या संदर्भात मी सगळ्या बँकांना सांगितले आहे की हेडक्वार्टरमधून प्रत्येक ब्रांचला त्यांनी पत्र पाठवून सांगितले पाहिजे की क्रॉप लोडसाठी सीबीलची आवश्यकता नाही. तसेच सीबीलसाठी कुठल्याही शेतकऱ्याची अडवणूक करायची नाही. या संदर्भात आज आपण आदेश काढेल आहेत. बँकांसोबत कर्ज माफीच्या संदर्भात चर्चा यासोबतच या बँकांसोबत आम्ही कर्ज माफीच्या संदर्भात आम्ही चर्चा केली आहे. जी काही कर्ज माफी करायची आहे त्या संदर्भात जुन्या खात्यांवर जो काही त्यांना कट घ्यायचा असतो त्या संदर्भात आणि एकूण कर्जमाफीची माहिती ही कुठल्या फॉरमॅट त्यांनी द्यायची, कुठल्या फॉरमॅटमध्ये आम्ही ती करायची, याबाबत चर्चा झाल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. राज्यावर सध्या अल निनोचे संकट देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रात विशेषतः सगळ्यात मोठा हंगाम हा खरीपाचा असतो, त्यानंतर रबी आणि उन्हाळी पीक लोक घेतात. साधारणपणे खरीपाचे जे क्षेत्र आहे ते 152 लाख हेक्टरचे क्षेत्र आहे आणि यात साधारणपणे सगळ्यात मोठे क्षेत्र हे सोयाबीन आणि कापूस जवळपास 88 लाख हेक्टर त्या ठिकाणी असते. आत्ता जो काही या वर्षीचा खरीप हंगाम आहे यात मोठे संकट आहे ते अल निनोचे संकट आहे. आज हवामान खात्याने जी काही मांडणी केली आहे त्यात जे काही लॉन्ग टर्म अॅवरेज आहे पावसाचे ते 88 टक्के असेल, असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. तरी वेगवेगळ्या भागात ते वेगवेगळ्या पद्धतीचे असेल. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागात याची तीव्रता अधिक असण्याची शक्यता आहे. उतरत्या क्रमाने पाऊस असण्याची शक्यता आजच्या खरीप हंगामच्या बैठीत आपल्याला हवामानाच्या अंदाजानुसार प्लॅनिंग कसे करता येईल हा प्रयत्न आपण केला आहे. विशेषतः साधारणपणे उतरत्या क्रमाने पाऊस असण्याची शक्यता जास्त आहे. जूनमध्ये येईल, त्या पेक्षा कमी जुलैमध्ये, त्यापेक्षा कमी ऑगस्टमध्ये आणि त्यापेक्षा कमी सप्टेंबरमध्ये असेल हा प्राथमिक अंदाज आहे. पावसाच्या दोन दिवसांमध्येही अंतर येण्याची शक्यता आहे आणि याचा परिणाम पिकांवर होऊ शकतो. त्यामुळे पडलेला पाऊस थांबवू शकलो तर त्यात प्रोटेक्टिव्ह इरीगेशन करता येईल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. प्रत्येक जिल्ह्याला अल निनोचे नियोजन करण्याच्या सूचना पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, आता प्रत्येक जिल्ह्याला आपण अल निनोच्या संदर्भातील नियोजन करण्यासाठी दिले आहे. त्या संदर्भात थोडे वाण आणि बियाणे कसे उपलब्ध करून दिले जाईल याचे प्रयत्न असणार आहेत. प्रशासन असेल किंवा कृषी विद्यापीठ असतील यांना आपण या संकटाला सामोरे जाण्यास सज्ज राहण्यास सांगितले आहे. कमी पाण्यात आपण कसे काम केले पाहिजे यावर देखील विचार केला जात आहे. साथी पोर्टलवर नोंदणी असलेलेच बियाणे घ्या देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपला हा प्रयत्न आहे की सगळे बियाणे हे प्रमाणित असावे. यासाठी आपण ‘साथी’ पोर्टल बनवले आहे. साथी पोर्टलवर नोंदणी असलेलेच बियाणेच विकत घेण्यात यावे असा आग्रह असणार आहे. यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही. या माध्यमातून योग्य बियाणे त्यांना मिळेल. महाविस्तार 2.0- शेतकऱ्यांच्या घरचा कृषितज्ञ देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज आपण 4 महत्त्वाच्या गोष्टी लॉंच केल्या आहेत. यात महाविस्तार 2.0 या अॅपचे लॉंचिंग केले आहे. हे अॅप म्हणजे शेतकऱ्यांचा घरचा कृषितज्ञ आहे. शेतकरी आपल्या भाषेत त्यावर प्रश्न विचारू शकतो आणि त्यावर लगेच उत्तर मिळेल. शेती संदर्भात जी काही माहिती हवी असेल ती सगळी माहिती या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणार आहे. याच्या व्यतिरिक्त आपण कॉलिंगची सुद्धा सिस्टम सुरू केली आहे. तसेच त्यांच्या भागात पाऊस कधी पडणार आहे हे देखील यातून सांगता येणार आहे. यासोबतच क्रॉप्सअॅप ही सुद्धा व्यवस्था आपण केलेली आहे. यात पिकाचा कुठल्याही स्टेजवर फोटो काढून अपलोड केला तर त्यावर कधी कीड येणार आहे, त्यावर उपाय काय या सगळ्याची माहिती दिली जाणार आहे. डिजिटल क्रॉप सर्व्हे देवेंद्र फडणवीस म्हणाले, केंद्र सरकारने आता डीसीएसची व्यवस्था केली आहे, त्याचे आज आपण लॉचिंग केली आहे. यात आपण आपल्या मोबाइलने आपल्या क्रॉपचा सर्व्हे जो आहे अपलोड केरू शकतो. हे कोणताही शेतकरी करू शकतो. आमच्याकडे कोणी सर्व्हे करायला आले नाही, हे सांगता येणार नाही. अनेकवेळा कापसाच्या सोयाबीनचा विमा काढला जातो, म्हणजे दुसऱ्याच पिकाचा विमा काढला जातो, असे आता करता येणार नाही. सेंट्रल बँक डिजिटल करंसी देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज आपण सेंट्रल बँक डिजिटल करंसीचे देखील लॉंचिंग केले आहे. आता शेतकऱ्याला त्याच्या योजनेचे जे पैसे आहेत ते त्याच्या वॉलेटमध्ये जातील आणि अपरूव्हड व्हेंडर जो आहे, त्याने जर ती गोष्ट विकत घेतली तर अपरूव्हड व्हेंडरला त्याच्या वॉलेटमधून पैसे मिळतील. त्याने जर घेतले नाही तर ते पैसे परत येतील. ब्लूप्रिंट इन ट्रेसेबिलीटी इन क्रॉप्स अँड फ्रुट्स देवेंद्र फडणवीस म्हणाले, अलीकडच्या काळात आपण जे काही एक्सपोर्ट करतो त्या एक्सपोर्टमध्ये कंटेनर यासाठी परत येतात, की जो काही माल आहे त्याची ट्रेसेबिलीटी नसते. त्यामुळे आता आपण ब्लूप्रिंट इन ट्रेसेबिलीटी इन क्रॉप्स अँड फ्रुट्स याचे लॉंच केले आहे. त्यामुळे फक्त क्यूआर कोड आहे त्यावर क्लिक केल्यानंतर कुठल्या जिल्ह्यातल्या, कुठल्या तालुक्यातल्या कुठल्या शेतीमध्ये ते तयार झाले आहे हे कळणार आहे. तसेच त्यात काय काय वापरले आहे हे सुद्धा कळणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!