ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

काँग्रेसने बारामती निवडणुकीतून माघार घेतली नाही:भाजप मुद्दाम अफवा पसरवून राष्ट्रवादीची फसवणूक करत आहे, काँग्रेसची स्पष्टोक्ती

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


काँग्रेसने बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीतून माघार घेतली नाही. भाजप या प्रकरणी मुद्दा अफवा पसवून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसची फसवणूक करत आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बुधवारी स्पष्ट केले आहे. बारामती विधानसभा मतदासंघात येत्या 23 तारखेला पोटनिवडणूक होत आहे. ही जागा अजित पवारांच्या निधनानंतर रिक्त झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार येथून सत्ताधारी महायुतीतर्फे निवडणूक लढवत आहेत. त्यांना विरोधी बाकावरील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासह शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानेही पाठिंबा दिला आहे. पण काँग्रेसने ही लढवण्याची घोषणा करत येथून आकाश मोरे यांना उमेदवारी दिली आहे. पण आज अचानक काँग्रेसने उमेदवारी अर्ज मागे घेतल्याची चर्चा सुरू झाली असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी तातडीने उपरोक्त स्पष्टीकरण दिली आहे. काँग्रेसशी भाजपच्या कोणत्याही नेत्याने संपर्क साधला नाही बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबत भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही नेत्याने काँग्रेस पक्षाशी अद्याप संपर्क साधलेला नाही. या संदर्भात प्रसारित होत असलेल्या बातम्या पूर्णपणे खोट्या, दिशाभूल करणाऱ्या आणि निराधार आहेत. अशा अफवा मुद्दाम पसरवून भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसची फसवणूक करत आहे, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणी स्थिती स्पष्ट करताना सांगितले आहे. ‘झाडखाऊ’ म्हणत फडणवीसांवर निशाणा हर्षवर्धन सपकाळ यांनी नाशिक येथील वृक्षतोडीच्या मुद्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला आहे. या प्रकरणी त्यांनी फडणवीसांचा उल्लेख ‘झाडखाऊ’ असा केला आहे. ‘झाडखाऊ’ची कुऱ्हाड आरे नंतर आता नाशिक वर, उद्या असेल संपूर्ण महाराष्ट्रावर, असे ते म्हणालेत. या प्रकरणी त्यांनी एक फोटोही पोस्ट केला आहे. त्यात देवेंद्र फडणवीस यांच्या हातात कुऱ्हाड असून, त्यांच्यापुढे तोडलेल्या झाडांचे बुंधे दिसत आहेत. हे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे.
विजय वडेट्टीवारांचाही महायुतीवर निशाणा दुसरीकडे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही नाशिक येथील कुंभमेळ्यातील कथित भ्रष्टाचारावरून महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. या प्रकरणी त्यांनी सत्ताधारी महायुतीमधील घटकपक्षांना मलिदा गँगची उपमा दिली आहे. “हिंदू खतरे मे है…, एक है तो सेफ है, बटेंगे तो कटेंगे” असे हिंसक नारे भाजपला का द्यावे लागतात हे आता सर्वांना समजलंच असेल. भ्रष्टाचार संपवण्याच्या नावाखाली सत्तेत आलेले बोके स्वतःच भ्रष्टाचाराचे लोणी खाण्यात मग्न झाले आहेत. जनतेला याची खबर होऊ नये म्हणून त्यांच्यात धार्मिक वाद पेटण्याचे कसब भाजपने वापरले. धर्माच्या नावावर सत्तेत आलेले स्वतः मात्र कुंभमेळ्यासारख्या पवित्र धार्मिक कार्यातही कोट्यावधींचा भ्रष्टाचार करत आहेत. हा पैसा महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचा आहे. आपल्या भ्रष्टाचाराने, अमानुष वृक्षतोडीने कुंभमेळ्यासारख्या पवित्र कार्याला बदनाम करणाऱ्या ट्रिपल इंजिन मलिदा गँगला या भ्रष्टाचाराचा हिशोब द्यावाच लागेल, असे वडेट्टीवार म्हणालेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर