ब्रेकिंग न्यूज
उभ्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा … Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report
SP News Maregaon

पालकमंत्री झिरवाळांच्या ऑनलाईन बैठकांचे गुपित कायम:हिंगोलीत त्यांच्या कार्यकाळात मंजूर झालेली सर्व कामे रद्द करण्याची मागणी

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


हिंगोली जिल्ह्यात केवळ ध्वजवंदनासाठी येणाऱ्या पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी जिल्हा नियोजन समितीच्या घेतलेल्या ऑनलाईन बैठकांचे गुपित कायम आहे. जे नाशिकला पोहोचले त्यांचीच कामे मंजूर झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे आता त्यांच्या कार्यकाळात मंजूर झालेली तसेच निविदा न काढलेली कामे तातडीने रद्द करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. हिंगोलीचे पालकमंत्री म्हणून नरहरी झिरवाळ यांची निवड झाल्यानंतर पहिल्याच दौऱ्यापासून ते वादग्रस्त ठरले आहेत. वसमत येथील पहिल्याच भेटीत त्यांनी मागास जिल्हयाचा पालकमंत्री म्हणून निवड केल्याने नाराजी व्यक्त केली. त्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हिंगोली जिल्ह्यातील कार्यक्रमांनाही त्यांनी पालकमंत्री या नात्याने हजेरी लावलीच नाही. त्यामुळे त्यांची नाराजी उघड झाल्याचे दिसून आले. दरम्यान, हिंगोली मागास जिल्हा, गरिब जिल्हा असे वक्तव्य करून रोष ओढून घेणाऱ्या पालकमंत्री झिरवळांनी टिका होऊ लागलाच यु टर्न घेतला अन गरिब जिल्हयात विकास कामे करता येतील असे आपले म्हणणे होते असे सांगत आपल्या वक्तव्यावर पांघरून घातले. मात्र हिंगोलीत ध्वजवंदन कार्यक्रमास उपस्थिती लावणाऱ्या पालकमंत्री झिरवळांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतलीच नाही. त्यांच्या कार्यकाळात झालेल्या सुमारे तीन बैठका त्यांनी ऑनलाईनच घेतल्या. या बैठकानंतर जे नाशीकला पोहोचले त्यांचीच कामे मंजूर झाली अन इतरांच्या कामांना मात्र नंतर पाहूत असे सांगत बाजूला केल्याची चर्चा सुरु झाली होती. त्यामुळे हिंगोलीकरांच्या नाशीकच्या वाऱ्या चांगल्याच वाढल्या होत्या. तर काही तथाकथीत कंत्राटदार देखील कामांचे प्रस्ताव घेऊन स्वतःच नाशीककडे जाऊ लागले होते. त्यामुळे झिरवाळांच्या कार्यपध्दतीवर रोष व्यक्त होऊ लागला होता. पालकमंत्री तुपाशी अन अधिकारी उपाशी अशी म्हण शासकिय कार्यालयांमधून विशीष्ट आर्थाने बोलली जाऊ लागली होती. दरम्यान, पालकमंत्री झिरवाळांच्या कथीत व्हिडीओने राज्यभरात खळबळ उडाली असली तर त्यांच्या या अफाट कर्तृत्वाने हिंगोलीचे नांव मात्र लयाला गेले आहे. यामुळे जिल्हाभरातून आता पालकमंत्री झिरवाळ यांच्या कार्यपध्दतीवर टिका होऊ लागली आहे. जिल्हा नियोजन समितीची मंजूर झालेली अन ज्या कामांच्या निवीदा काढलेल्या नाहीत ती कामे रद्दच करण्याची मागणी पुढे येऊ लागली आहे. सदर कामे रद्द केल्यानंतर ऑनलाईन बैठकीचे गौडबंगाल उघड होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर