ब्रेकिंग न्यूज
श्रावणात श्री क्षेत्र पांडवदेवीत भक्तांची अलोट गर्दी भाजपा मारेगाव शहर सरचिटणीसपदी रविंद्र टोंगे पैशांचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी पूजा; 15 वर्षीय मुलीसोबत घडणार होतं नको तेच, 15 जणांविरुद्ध गुन्हा पहाटे घराबाहेर पडताच तो मागे लागला; कॉलेजच्या वाटेत अडवलं अन् मुंबईत घडला भयंकर प्रकार IND vs SL Test : बॉलिंगने आग ओकणाऱ्या DSP सिराजचा बॅटिंगमध्ये जलवा; गगनचुंबी सिक्स पाहून श्रीलंका आवाक्, पा… पिसगाव येथे मिस्त्री कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या Dhiraj Pardeshi Case Update | धीरज परदेशी प्रकरणी पोलिसांची कारवाई | Ahilyanagar Crime News पावसाळ्यात जनावराच्या तोंडाला अन् जिभेवर फोड, असू शकतो गंभीर आजराचा धोका, अशी घ्या काळजी वाह रे मित्र…! घरी आला, खाल्लं, पिलं अन् जाता जाता…, कोल्हापूर पोलिसांनी 24 तासांत उचललं महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी
SP News Maregaon

झेडपी निवडणुकीत दिग्गजांच्या वारसांनी मारली बाजी!:वळसे पाटील, सावंत, गोगावले आणि जाधव कुटुंबांचे वर्चस्व कायम

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. या निवडणुकीत सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे प्रस्थापित राजकीय नेत्यांच्या नातेवाईकांनी मिळवलेले घवघवीत यश. आपल्या कुटुंबाचा राजकीय वारसा पुढे नेत या वारसांनी विरोधकांना धूळ चारली असून, अनेक मतदारसंघांमध्ये घराणेशाहीचा प्रभाव पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. पुणे जिल्हा : वळसे पाटील आणि पठारेंचा करिश्मा पुणे जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडीत काँटे की टक्कर असताना, दिग्गज नेत्यांच्या नातेवाईकांनी आपली जागा सुरक्षित केली आहे. आंबेगाव मतदारसंघात माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रतिष्ठेच्या लढतीत त्यांचे पुतणे विवेक वळसे पाटील यांनी पारगाव जरकवाडी गटातून २ हजार १३० मतांची निर्णायक आघाडी घेत विजय निश्चित केला. पुरंदर तालुक्यात माजी आमदार बापूसाहेब पठारे यांची कन्या रूपाली झेंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर विजय मिळवला. विशेष म्हणजे, पुरंदरमधील दोन्ही पंचायत समिती सदस्यही राष्ट्रवादीचेच निवडून आल्याने तालुक्यावर पक्षाची पकड अधिक घट्ट झाली आहे. सोलापूर जिल्हा : सावंत आणि सातपुतेंचा विजय सोलापूर जिल्ह्यात हाय-व्होल्टेज ठरलेल्या लढतींमध्ये सावंतांच्या पुतण्याने विक्रमी बाजी मारली आहे. माढा तालुक्यातील मानेगाव गटातून माजी मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे पृथ्वीराज सावंत यांनी भाजपच्या तिकिटावर ६ हजार ८०० मतांच्या विक्रमी मताधिक्याने प्रतिस्पर्ध्याचा धुव्वा उडवला. भाजप नेते राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांनीही दहिगाव गटातून विजय मिळवत राजकीय क्षेत्रात यशस्वी एन्ट्री केली आहे. कोकणात ‘भास्कर जाधव’ आणि ‘गोगावलें’चा वारसा यशस्वी कोकणातील राजकीय बालेकिल्ल्यांमध्येही नेत्यांच्या मुलांनी आपला प्रभाव कायम ठेवला आहे. रत्नागिरीच्या गुहागरमध्ये आमदार भास्कर जाधव यांचे चिरंजीव विक्रांत जाधव यांनी असगोली गटातून पहिल्या फेरीपासूनच वर्चस्व राखत विजय संपादन केला. रायगडमध्ये आमदार भरत गोगावले यांचे चिरंजीव विकास गोगावले यांनीही आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत प्रतिस्पर्धी उमेदवाराचा पराभव केला. परभणीत माजी मंत्र्यांना मोठा धक्का दरम्यान, परभणीकरांनी घराणेशाहीला घरचा रस्ता दाखवला आहे. भाजपचे माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांना मोठा धक्का बसला असून, कुटुंबातील 5 पैकी चौघांचा पराभव झाला आहे. माजी मंत्री सुरेश वरपुडकरांच्या कुटुंबातून पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यापैकी केवळ एका जागी विजय मिळवण्यात वरपुडकरांना यश आले आहे. तर मुलगा, मुलगी, सून आणि एका पुतण्याला या निवडणुकीत पराभवाला समोर जावे लागले आहे

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर