ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

मारेगाव पोलिसांची अवैध रेती वाहतुकीवर मोठी कारवाई; ६.२० लाखांचा मुद्देमाल जप्त

3 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

साखरा गावाजवळ पोलिसांचा थरार; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव: तालुक्यात चोरट्या मार्गाने होणाऱ्या वाळू तस्करीला लगाम लावण्यासाठी मारेगाव पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. १० फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास साखरा गावाजवळ पोलिसांनी एका टिप्परवर छापा टाकत ४ ब्रास अवैध रेतीसह ६ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोन तस्करांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सविस्तर वृत्त असे की, मारेगाव पोलीस ठाण्याचे एएसआय दिगांबर किनाके आणि शुभम उईके हे मंगळवारी पहाटे बिट परिसरात गस्तीवर होते. कुंभा ते करनवाडी रोडवरील साखरा गावाजवळ पहाटे ३:३० ते ४:०० च्या दरम्यान त्यांना एम.एच. २९ टी १५३३ क्रमांकाचा टिप्पर संशयास्पदरीत्या येताना दिसला. पोलिसांनी तातडीने वाहन थांबवून पंचासमक्ष झडती घेतली असता, त्यात विनापरवाना ४ ब्रास वाळू साठा आढळून आला.

पोलिसांनी २० हजार रुपये किमतीची रेती आणि ६ लाख रुपये किमतीचा टिप्पर असा एकूण ६ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी आरोपी ज्ञानेश्वर गणपतराव ठाकरे (५५, रा. कळंब) आणि सचिन दरने (४५, रा. हिवरा, ता. कळंब) यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२), ४९, मोटार वाहन कायदा तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

सदर धडक कारवाई पोलीस निरीक्षक श्याम वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय दिगांबर किनाके व पोलीस शिपाई सागर दिपेवार, शुभम उईके यांनी पार पाडली. या कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर