ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

कोडपखिंडी येथील कोंबड बाजारावर कार्यवाही

115 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

२ लाख २५ हजाराचा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ ची कारवाई

उपसंपादक झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

झरी जामनी तालुक्यातील पोलिस स्टेशन पाटण हद्दीतील ग्राम कोडपाखिंडी जंगल परिसरातील कोंबड बाजारावर धाड टाकुन २,२५,८६०/-रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.स्थानिक गुन्हे शाखा,यवतमाळ यांनी सदर कारवाई केली.या पूर्वी पण त्याच कोंबड बाजारावर कार्यवाही करण्यात आली होती.


दिनांक १४/०१/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक वणी येथे हजर असतांना गोपणीय माहिती मिळाली की,पाटण पो.स्टे. हद्दीतील ग्राम कोडपाखिंडी गावाचे बाजुला असलेल्या जंगलामध्ये सार्वजनिक ठिकाणी खुल्या जागेत काही इसम हे कोंबडयाच्या पायाला लोखंडी काती बांधुन त्याची झुंज लावुन त्यावर पैशांची बाजी लावुन हारजीतचा खेळ खेळवित आहेत अशी विश्वसनीय खबर मिळाल्याने पथकाने स्थानिक पोलीस स्टेशन मधील अंमलदार यांना सोबत घेवुन प्राप्त माहिती प्रमाणे ग्राम कोडपाखिंडी बाजूला असलेल्या जंगल परसिरात जावुन छापा कारवाई केली

असता गंगाधर अय्या आत्राम वय २५ वर्षे, रा. माडवा ,जिवन सुनिल मानकर वय २५ वर्षे, रा. कोडपाखिंडी,अनिल रामचंद्र पावडे वय ५६ वर्षे, रा. लहान पांढरकवडा,भिमराव धर्माजी पेंदोर वय ४४ वर्षे, रा. टेंबी , शंकर विठ्ठल आकुलवार वय ३० वर्षे, रा. माडवा , शंकर सुर्यभान बोपाटे वय ४१ वर्षे, रा. मारकी,आणि लक्ष्मण रामा आत्राम वय ४० वर्षे, रा. माडवा हे सर्व ता. झरी, हे मोक्यावर मिळुन आले नमुद इसमांचे झडतीमधुन नगदी १८७८०, रुपये, ४ नग लोखंडी काती व ०४ कोंबडे (झुंज लढवण्याकरीता वापरात आणलेले) तसेच ०७ नग मोटार सायकल असा एकुण २,२५,८६०/- रुपयाचा मुद्देमाल मिळुन आल्याने नमुद आरोपीतांविरुध्द पोलीस स्टेशन पाटण येथे महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची हि कार्यवाही डॉ.पवन बन्सोड, पोलीस अधीक्षक यवतमाळ, पियूष जगताप, अपर पोलीस अधीक्षक, यवतमाळ, आधारसिंग सोनोने पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा. यवतमाळ, यांचे मार्गदर्शनात सपोनि अतुल मोहनकर, स्था.गु.शा. यवतमाळ, सपोनि संदीप पाटील ठाणेदार पोस्टे पाटण, पोलीस अंमलदार योगेश डगवार, सुनिल खंडागळे, सुधिर पांडे, निलेश निमकर, रजनिकांत मडावी, सतिष फुके सर्व स्था.गु.शा. यवतमाळ तसेच पोलीस अंमलदार अमित पोयाम पो.स्टे. पाटण यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर