ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

राष्ट्रवादीच्या विलीनकरणाविषयी हवेत पतंगबाजी का करायची?:फडणवीसांचा प्रतिप्रश्न; म्हणाले- विलीनकरण झाले तर बोलणार

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राष्ट्रवादीच्या विलीनकरण संदर्भात त्यांचा पक्षाचा अंतर्गत विषय आहे. त्याविषयी माझा बोलण्याचा काहीही संबंध नाही. त्यांचा पक्षांतर्गत निर्णय झाल्यानंतर ते महायुतीकडे तसा प्रस्ताव घेऊन येतील. त्यानंतर मात्र, नक्कीच याविषयी बोलणे योग्य ठरेल. मात्र, तोपर्यंत हवेत पतंगबाजी का करायची? असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे. या माध्यमातून राष्ट्रवादीच्या विलीनकरणाविषयी फडणवीसांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आज मंत्रिमंडळाची पहिलीच बैठक होती. तर उपमुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार यांची देखील ही पहिलीच मंत्रिमंडळ बैठक होती. मात्र, दुखवट्यामुळे केवळ शब्दसुमनांनी आम्ही सुनेत्रा पवार यांचे स्वागत केले. अजित पवार यांच्या स्वप्नांना पूर्ण करत त्यांच्या प्रमाणेच सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून कामे होतील, अशी अपेक्षा देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. अजित पवार यांना श्रद्धांजली आणि शोक प्रस्ताव मंजूर सुनेत्रा पवार यांच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज सुनेत्रा पवार यांची पहिली मंत्रिमंडळ बैठक होती. अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांनी संयमाने जबाबदारी स्वीकारली आहे. म्हणूनच, आज आम्ही त्यांचे स्वागत केले. मला विश्वास आहे की त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांचा पक्ष आणखी मोठे यश मिळवेल. त्यांच्या पक्षाच्या विलीनीकरणाच्या निर्णय प्रक्रियेवर चर्चा करणे योग्य नाही. त्या स्वतः तो निर्णय घेतील. आज मंत्रिमंडळाने अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली आणि शोक प्रस्ताव मंजूर केला. चंद्रपूरमध्ये भाजपचा महापौर झाल्याचा आनंद चंद्रपूर मध्ये भारतीय जनता पक्षाचा महापौर झाला असल्याची माहिती मला आत्ताच मिळाली असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. मात्र त्या मागील राजकारणाची सध्या आपल्याला काहीही कल्पना नसल्याचं ते म्हणाले. यासंबंधी माहिती घेऊन मी बोलेल. भाजपच्या महापौर झाल्यामुळे त्यांचे माझ्याकडून खूप खूप अभिनंदन. भाजपचा महापौर झाल्याचा आपल्याला देखील आनंद असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर