ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 22 जूनपासून 10 जुलैपर्यंत चालेल:शेतकरी कर्जमाफी अटींवरून विरोधकांची सत्ताधाऱ्यांना घेरण्याची तयारी

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महाराष्ट्र विधानसभेचे आगामी पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै दरम्यान होणार आहे. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत या ३ आठवड्यांच्या सत्रावर शिक्कामोर्तब झाले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी व विरोधक आमनेसामने येणार असल्याने राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. गेल्या ६ वर्षांत कधी अवघ्या ६ दिवसांचे, तर कधी ३ आठवड्यांपर्यंत चाललेल्या अधिवेशनांचा थरार राज्याने पाहिला आहे. त्यामुळे यंदाचे हे अधिवेशनही हायव्होल्टेज ठरणार आहे. नुकतीच सरकारने जाहीर केलेली २ लाख रुपयांची कर्जमाफी या अधिवेशनात कळीचा मुद्दा ठरेल. ‘२ लाखांवरील थकबाकी आधी भरा, मगच लाभ मिळेल’ या जाचक अटीने शेतकऱ्यांत तीव्र असंतोष आहे. रोहित पवार यांनी याच अटीविरोधात अन्नत्याग आंदोलन करत सरकारची कोंडी केली होती. हाच धागा पकडून विरोधक सभागृहात सरकारला धारेवर धरतील. १४ दिवसांचेच सत्र का? : पटोले अधिवेशन कालावधी कमी असल्यावरून काँग्रेस नेते नाना पटोले आक्रमक झाले. जनतेत आक्रोश असताना केवळ १४ दिवसांत अधिवेशन गुंडाळण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव आहे. फूट, बंड अन् अनपेक्षित ‘ट्विस्ट’ महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनांचा इतिहास बदलत्या राजकीय समीकरणांचा आरसा आहे. २०२१ मध्ये कोरोनामुळे केवळ २ दिवसांचे सत्र झाले. २०२२ मध्ये शिवसेनेत फूट पडून शिंदे-फडणवीस सरकार आल्यावर ६ दिवसांचे छोटे अधिवेशन पार पडले. २०२३ चे सत्र अजित पवारांच्या अनपेक्षित सत्तासहभागामुळे रंगतदार ठरले. २०२४ मध्ये निवडणुकांमुळे उशिरा सुरू झालेल्या सत्रात अतिरिक्त अर्थसंकल्प मांडला गेला. २०२५ मध्ये ‘नागरी नक्षलवादाविरोधी’ विधेयकामुळे अधिवेशन गाजले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर