ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

खानापुरात सुहास बाबरांचा ‘करेक्ट कार्यक्रम’:भाजपचा सुपडासाफ, शिवसेनेचा भगवा फडकला; विजयानंतर ठोकला शड्डू

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुख्यमंत्र्यांना जाऊन विचार, मी कोण आहे. माझ्यासारखे 242 आमदार आहेत म्हणून तुझा मुख्यमंत्री बसला आहे, अशा शब्दांत भाजपला शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास बाबर यांनी आव्हान दिले होते. तसेच मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केला होता. आता याच सुहास बाबर यांनी आपला गड राखत भाजपचा सुपडासाफ केल्याचे पाहायला मिळत आहे. खानापुरातल्या जिल्हा परिषदेच्या चारही जागा आणि पंचायत समितीच्या आठही जागा शिवसेना शिंदे गटाने जिंकल्या असून भाजपला इथे एकही जागा मिळू शकली नाही. सांगलीच्या नागेवाडी जिल्हा परिषद गटातून आमदार सुहास बाबर यांच्या वहिनी, शिवसेनेच्या उमेदवार डॉ. शीतल बाबर या विजयी झाल्या आहेत. खानापूर तालुक्यात शिवसेनेला यश मिळाल्यानंतर आमदार सुहास बाबर यांनी शड्डू ठोकल्याचे पाहायला मिळाले. खानापूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रचारात भाजपच्या स्थानिक नेत्यांशी थेट भिडणारे आमदार सुहास बाबर यांनी निकालात आपली सरशी कायम राखत राजकीय वर्चस्व सिद्ध केले आहे. प्रचारादरम्यान खानापुरात दोन्ही राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेना आणि काँग्रेस आपणच चालवतो, अशा शब्दांत भाजप नेत्यांना दिलेला दम आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेत दिलेला इशारा, या सर्वांवर त्यांच्या विजयाने आता शिक्कामोर्तब केल्याचे दिसून येत आहे. मावळमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा डंका!:विजयानंतर सुनील शेळकेंचे डोळे पाणावले मावळ जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या 2026 च्या निवडणुकीत आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सर्व 5 जिल्हा परिषद आणि 10 पंचायत समिती जागांवर घवघवीत यश मिळवले आहे. या विजयानंतर कौतुक करायला अजित पवार हयात नसल्याने सुनील शेळके भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. वाचा सविस्तर

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर