ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

व्यासंगी लेखकाचे जाणे:ज्येष्ठ साहित्यिक प्रा. बलवंत जेऊरकर यांचे हृदयविकाराने निधन; स्नायू आक्रसत जाणाऱ्या आजाराने होते त्रस्त

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


ज्येष्ठ साहित्यिक आणि सांगली येथील विलिंग्डन महाविद्यालयाचे प्राध्यापक बलवंत जेऊरकर यांचे गुरुवार, 11 जून रोजी पहाटे हृदयविकाराने निधन झाले. ज्येष्ठ अनुवादक, लेखक आणि हिंदी भाषा साहित्याचे ते व्यासंगी होते. अनुवादासाठी साहित्य अकादमी पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते. हिंदीतील अमृत राय लिखित प्रेमचंद- लेखणीचा शिलेदार या चरित्र ग्रंथाचा त्यांनी मराठीत अनुवाद केला होता. मंगलेश डबराल, राजेश जोशी, पवन करण आणि अमृत राय ह्यांच्या साहित्यकृती जेऊरकर यांनी मराठीमध्ये आणल्या होत्या. त्यांचा डॉ. नीळकंठ रथ अनुवाद पुरस्कार आणि बाळशास्त्री जांभेकर पुरस्काराने गौरव झाला होता. ज्येष्ठ कवी आणि गीतकार दासू वैद्य यांनी जेऊरकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केले. ते आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, ‘बळवंतराव, हे कसलं भाषांतर..? अजून संपूर्ण अर्थ आकळलाही नाही..आणि लेखणी खाली ठेवूनही दिलीत…मित्रा, खूपच घाई केलीस …(उत्तम अनुवादक असणाऱ्या प्रा. बळवंत जेऊरकर यांचं वयाच्या पन्नाशीत दुःखद निधन… श्रद्धांजली वाहवत नाहीए…) साहित्यिक प्रवीण बांदेकरांची पोस्ट लेखक, कवी प्रवीण बांदेकर यांनी बलवंत जेऊरकर यांच्यावर एक पोस्ट लिहिलीय. त्यात ते म्हणतात, ‘बलवंत जेऊरकरचं अकाली जाणं धक्कादायक आहे! गेली काही वर्षे तो कसल्यातरी स्नायू आक्रसत जाणाऱ्या विचित्र आजाराने त्रस्त होता. तशातही त्याचं नोकरी आणि भाषांतरांचं काम सुरूच होतं. नुकतंच त्याने बद्रीनारायणच्या साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त ‘तुमडी के शब्द’ या कवितासंग्रहाचे भाषांतर पूर्ण केले होते. गेल्या महिन्यात तो अकादमीकडूनच प्रकाशित झाला आहे. हिंदीतील मंगलेश डबराल, राजेश जोशी, पवन करण, ज्ञानरंजन अशा अनेक महत्त्वाच्या कवी लेखकांच्या पुस्तकांची मराठी भाषांतरे त्याने केली आहेत. अमृत राय यांच्या ‘प्रेमचंद: कलम के सिपाही’ या ग्रंथांचं भाषांतरही विशेष उल्लेखनीय.’ प्रवीण बांदेकर पुढे म्हणतात की, ‘जी.के. ऐनापुरेनी त्याच्याविषयी पहिलं सांगितलेलं. आ. सो. शेवरेंच्या प्रसंवादच्या एका अंकाचं मी संपादन करत होतो. त्यासाठी त्याला अनुवादित कथा पाठवायला सांग, असं जीकेनं सुचवलेलं. तोवर बलवंतविषयी मला काहीच माहीत नव्हतं. त्याने कथा पाठवली नि आठवड्याभरात दुसरा ड्राफ्ट पाठवला दुरुस्त्या असलेला. परत एक दोन दिवसांआड फोनवरून दुरुस्त्या सुचवणं सुरूच असायचं. मी तर वैतागलोच होतो. मग एके दिवशी हा चक्क भेटायलाच आला सावंतवाडीत. मी स्टॅण्डवर त्याला आणायला गेलेलो. तर एक पंचविशीतला गोंडस पोरगा, नमस्कार! प्रवीण बांदेकर ना? विचारत आला. मी बलवंत जेऊरकर, अशी आपली ओळख करून देत. हा जेऊरकर? मला वाटलेलं कुणीतरी मोठा बाप्या असेल! विलिंग्डनभधला प्राध्यापक, डॉक्टरेट, नि आवाजही प्रौढ. त्याच्याबाबतीतले असे अनेक अंदाज मग चुकत गेले!’ प्रवीण बांदेकर आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, ‘पुढच्या काही वर्षांत भराभर त्याचे अनुवाद प्रकाशितही गेले. अकादमी पुरस्कारही मिळाला. तसे इतरही अनेक पुरस्कार. या ना त्या निमित्ताने आमच्या भेटी व्हायच्या. भरपूर गप्पाही. अलीकडे त्याच्या आजाराचं कळल्यावर कुठेतरी आतल्या आत चरकलो होतो. त्याची खेड इथे इंग्रजीची प्राध्यापक असलेली बहीणही अशाच आजारानं अकाली गेली होती, थोरल्या भावालाही तोच आजार. पण बळवंत यातून बाहेर येईल, काम करत राहील, असंच वाटत होतं. त्याच्यासोबतच्या अनेक भेटी – वेंगुर्ल्याचा किनारा, माणगावचं साने गुरूजी स्मारक, डबरालांच्या पुस्तकाचं प्रकाशन, सांगली नि सावंतवाडीतल्या अनेक भेटी, त्याचे कार्यक्रम, गझला आणि गाणी, गप्पा, आनंदानं मासे खाणं..लक्षात राहील! शांतपणे आपलं काम करता करता तितक्यात शांतपणे निघून गेलेला बलवंत विसरता येणार नाही…’ (हे वृत्त अपडेट होत आहे)

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर