ब्रेकिंग न्यूज
मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा … Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं
SP News Maregaon

ज्वलनशील पदार्थांच्या वाहतुकीसाठी SOP च नाही:मुख्यमंत्र्यांची कबुली; मुंबई – पुणे महामार्गावरील दुर्घटनेवर विधानसभेत चर्चा

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


चालू महिन्याच्या सुरुवातीला मुंबई – पुणे एक्सप्रेसवर प्रोपेलिन वायूचा टँकर उलटल्याने संपूर्ण महामार्ग ठप्प झाला होता. यामुळे तब्बल 32 तास ट्रॅफिक जाम होऊन वाहनचालकांचे प्रचंड हाल झाले होते. आज राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही हा मुद्दा गाजला. त्यात मुख्यमंत्र्यांनी अशा स्थितीला सामोरे जाण्यासाठी संबंधित इंधन कंपन्या व सरकारकडे कोणतीही एसओपी नसल्याची कबुली दिली. तसेच या प्रकरणी लवकरच ठोस पाऊले उचलण्याची ग्वाहीही दिली. भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी ज्वलनशील पदार्थांच्या वाहतुकीसाठी काही विशिष्ट नियम आहेत का? असा प्रश्न लक्षवेधी सूचनेद्वारे विधानसभेत मांडला. मुंबई- पुणे महामार्गावर ज्वलनशील पदार्थाची वाहतूक करणारा एक टँकर उलटल्यामुळे वाहनचालकांसह प्रशासनाची मोठी पंचाईत झाली, असे ते म्हणाले. त्यावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, 3 फेब्रवारी रोजी सायंकाळी 5 च्या सुमारास मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर मुंबईकडे जाणाऱ्या एका लेनवर प्रोपेलिन गॅसची वाहतूक करणाऱ्या एका टँकरचा अपघात झाला होता. सदर अपघातात टँकरमधील ज्वलनशील वायूची गळती सुरू झाली होती. सदर घटनेमुळे वाहतूक काही तास बंद ठेवून मुंबईकडे जाणारी वाहतूक लोणावळा व खोपोली मार्गावर वळवण्यात आली होती. अमित साटम यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने या टँकरची तपासणी करण्यात आली होती. त्याचा योग्य तो परवानाही घेतला होता. त्याची वारंवार तपासणी होत होती. परंतु, मुंबई – पुणे एक्सप्रेसवर एकेठिकाणी वाहन चालकाचा तोल जाऊन टँकर उलटला. पण या प्रकरणी आपल्या अधिकारी व वाहतूक पोलिसांचे कौतुक केले पाहिजे. टँकर पेटला असता तर मोठी हानी झाली असती सरनाईक पुढे म्हणाले, सदर टँकर उलटला पण वायू गळती झाली नाही. ती वायू गळती झाली असती तर फार मोठ्या प्रमाणात मनुष्यहाणी झाली असती. कारण, हा प्रोपेलिन हा वायू फार मोठ्या प्रमाणात ज्वलनशील आहे. त्याची योग्य प्रकारे त्याच ठिकाणी तजवीज करून व्यवस्था करण्यात आली. हा वायू पेटला असता टँकरच्या सभोवतालच्या 500 मिटरच्या परिघात फार मोठी हानी झाली असती. त्यामुळे ही वस्तुस्थिती आहे की, त्या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. पण अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन स्थिती मोठ्या हुशारीने हाताळली. आदित्य ठाकरेंनी केली महत्त्वपूर्ण सूचना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनीही या चर्चेत हस्तक्षेप केला. त्यांनी अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली. अशा घटना टाळण्यासाठी सरकार हॅझमॅट व्हेईकल यूनिट रस्त्यांवर का? व बोगद्यात आग लागली तर त्या प्रकरणांतही आपण अशी एखादी सोय करणार का? असे ते म्हणाले. त्यावर मंत्री सरनाईक म्हणाले, सरकारने एमएसआरडीसीला असे युनिट्स स्थापन करण्याचे आदेश दिलेत. एमआरडीसीने टोल नाक्यांवर घेण्यात आलेला टोल परत करण्याचाही निर्णय घेतला आहे. भविष्यात ज्वलनशील पदार्थांचा टँकर उलटला तर तो एअरलिफ्ट करता येईल का? यावरही विचार केला जात आहे. कंपन्या व सरकारकडे एसओपीच नाही – मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या चर्चेत सहभाग घेतला. ते म्हणाले, ज्वलनशील पदार्थांची वाहतूक करणाऱ्या आपल्या ज्या केंद्रीय कंपन्या आहेत, त्यांच्याकडे या परिस्थितीचा सामना करण्यासाठी जी उपकरणे हवी होती ती नव्हती. त्यामुळे आपल्याला या घटनेतून एक धडा मिळाला. या प्रकरणी आपल्याकडे एक एसओपीच नाही. ती एवढी वर्षे वाहतूक करणाऱ्या कंपन्यांकडेही नाही आणि सरकारकडेही नाही. त्यामुळे आपण संबंधित कंपन्यांना ही एसओपी तयार करण्याचे आदेश दिलेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी यावर समाधान व्यक्त केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर