ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

टिपू सुलतानचे समर्थन नाही, पण भाजपची कृतीही चुकीची:शिवरायांनी स्वराज्य घडवले, टिपूचे अत्याचार इतिहासात नोंदवलेले- अंबादास दानवे

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


टिपू सुलतान हे इंग्रजांच्याविरोधात लढले, हे सत्य जरी असले तरी त्यांनी काही अत्याचारही केलेत, असे पुरावे इतिहासात आहेत. मालेगावच्या उपमहापौर यांच्या दालनामध्ये टिपू सुलतानचा फोटो लागला यावरून हा सर्व वाद सुरू झाला आहे. पण केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला करणे चूक आहे, असे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. अंबादास दानवे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत कुणाचीही तुलना केली जाऊ शकत नाही. शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्वबळावर निर्माण केले होते. त्यानी माता-भगिणींची रक्षा केली होती. तर टिपू सुलतानने महिलेवर अत्याचार केल्याचे पुरावे आहेत. त्यामुळे त्याची बरोबरी होऊच शकत नाही. टिपू सुलतानच्या विचारांचं समर्थन होऊ शकत नाही, पण भाजपची भूमिका दुटप्पी आहे. सपकाळांच्या वक्तव्याचे समर्थन होऊच शकत नाही, पण म्हणून काँग्रेस कार्यालयावर हल्ला करणे योग्य नाही. भाजपची भूमिका दुटप्पी अंबादास दानवे म्हणाले की, टिपू सुलतानचे नाव मार्गाला द्यावे, असा मुंबई मनपामधील भाजपच्या नगरसेवकांचा ठराव समोर आला आहे. माजी राष्ट्रपती असलेल्या कोविंद यांनी त्यांची शहादत झाली असे म्हटले होते. तर अब्दुल कलाम आझाद यांनीसुद्धा टिपू सुलतानविषयी असेच वक्तव्य केले होते. तरीही कलाम यांना भाजपने राष्ट्रपतीपदाचे उमेदवार केले होते. हा भाजपचा दुटप्पीपणा आहे. काँग्रेसला टार्गेट करणे आणि आपल्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी काय निर्णय घेतले याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे राज्यातील मुख्य प्रश्नांवरून लक्षविचलित व्हावे यासाठी हा मुद्दा काढलेला दिसतो. भाजपने जिन्नाच्या कबरीला जाऊन पुष्पहार अर्पन केला अंबादास दानवे म्हणाले की, टिपू सुलतान कोणाला आवडतो किंवा नाही आवडत, हा ज्याचा त्याचा विषय आहे. टिपू सुलतान इंग्रजांविरोधात लढले हे सत्य असले तरी त्यांनी हिंदूवर अत्याचार केले हे देखील तितकेच खरे आहे. टिपू सुलतानच्या विचारावर प्रेम असणारी औलाद अजूनही आपल्या देशात जिवंत आहे. हे जरी खरी असले तरी फोटो हा विषय व्यक्तिगत आहे. कोणी टिपू सुलतानचा फोटो लावावा की जिन्नाचा लावावा. भाजपने जिन्नाच्या कबरीला जाऊन पुष्पहार अर्पन केलेला आहेच, त्यामुळे तो व्यक्तिगत विषय आहे. हिंदू धर्म व्यापक, कुणीही मंदिरात जाऊ शकते आमदार अब्दुल सत्तार यांनी मंदिरात जात दर्शन घेतल्याच्या मुद्द्यावरून भाजपने टीका केली होती. यावर बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, मंदिर असो की मशीद असो ती सार्वजनिक ठिकाणं आहेत. भाजपचे कोण तुषार आहे तो काय शंकराचार्य लागून गेला का? एखादा मुस्लीम माणूस जर मंदिरात येत जर देवाचे दर्शन घेत असेल, तर त्यांचे स्वागत केले पाहिजे. त्याला विरोध करण्याची गरज नाही. हिंदू धर्म हा खूप व्यापक आहे त्यांना संकुचित करण्याचे काम भाजपकडून सुरू आहे. अवघे विश्वची माझे घर म्हणणारा हिंदू धर्म आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर