ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

टिपू सुलतान अत्याचारी अन् बलात्कारी:उद्धव ठाकरे आमदारकीसाठी छत्रपती शिवरायांचा अपमान सहन करतायत का?, भाजपचे नवनाथ बन यांचा सवाल

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान झालेला असताना उद्धव ठाकरे गप्प का बसले आहेत. 3 दिवसांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांची शिवरायांशी तुलना केली. ठाकरे एरवी छोट्या छोट्या मुद्द्यावर बोलत असतात आता त्यांची दातखिळी बसली आहे का? असा सवाल भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. नवनाथ बन म्हणाले की, टिपू सुलतानबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना केली जाते. तेही महाराष्ट्रात. तेही काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडून, असे असताना उद्धव ठाकरेंना घटनेचा निषेध का करावा वाटला नाही. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी त्यांना काँग्रेसची गरज आहे म्हणून ते टिपू सुलतानवर टीका करत नाही का? सपकाळांच्या वक्तव्याचा निषेध करत नाही का? असा सवाल बन यांनी केला आहे. उद्धव ठाकरेंनी निषेध का केला नाही? नवनाथ बन म्हणाले की, उद्धव ठाकरे तुम्ही केवळ आमदारकी हवी म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान सहन करत आहात का? तुमच्यात हिंमत असेल किंवा बाळासाहेब ठाकरे यांचा थोडासा जरी विचार शिल्लक असेल तर सपकाळांच्या फोटोला जोडो मारो आंदोलन करा ही धमक आहे का हे दाखवण्याची ही वेळ आहे. तुम्ही हिंमत दाखवत जाहीर निषेध करा. निवडणुकीच्या काळात रोज पत्रकार परिषद घेत होतात. त्यापूर्वी मुख्यमंत्री असताना रोज फेसबूक लाइव्ह येत होतात. किमान फेसबूक लाईव्ह करत तरी निषेध करणार का? आमचा टिपूला कायम विरोध नवनाथ बन म्हणाले की, भाजपचे धोरण स्पष्ट आहे की हिंदूवर जो अत्याचार करतो, हिंदू मंदिरांची जो तोडफोड करतो, महिलांवर अत्याचार करतो त्या टिपू सुलतानचे समर्थन करत नाही. अमित साटम आणि रितू तावडेंनी कोणता प्रस्ताव दिला नव्हता. आम्ही कधीच टिपू सुलतान समर्थनात भूमिका घेतली नाही आम्ही नेहमी विरोधात भूमिका घेणार आहोत. सचिन सावंत तुम्ही सपकाळ यांचा निषेध करणार आहात का? नाही तर तुम्हाला लाज वाटली पाहिजे. रामनाथ कोविंद यांच्याबद्दल तथ्य तपासले पाहिजे. आम्ही टिपू सुलतानचा कायम निषेध करत आलो आहोत. शिवरायांचा अपमान सहन करणार नाही नवनाथ बन म्हणाले की, आम्ही शिवरायांचा अपमान कधीही सहन करणार नाही. टिपू सुलतान हा अत्याचारी, नालायक, खलनायक, बलात्कारी आहे. सपकाळ यांनी नाक घासून माफी मागितली पाहिजे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला आहे. काँग्रेसकडून मतांसाठी टिपू सुलतानचा उदोउदो सुरू आहे. हा काही निवडणुकीचा विषय नाही. शिवाजी महाराज यांचा अपमान सहन करणार नाही. दानवेंची भाजपवर टीका उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे म्हणाले की, टिपू सुलतान हे इंग्रजांच्याविरोधात लढले हे सत्य जरी असले, तरी त्यांनी काही अत्याचारही केल्याचे पुरावेही इतिहासात आहेत. मात्र, दुसरीकडे टिपू सुलतानचे नाव मार्गाला द्यावे, असा मुंबई मनपातील भाजपच्या नगरसेवकांचा ठराव समोर आला आहे. माजी राष्ट्रपती असलेल्या कोविंद यांनी टिपू सुलतान यांची शहादत झाली असे म्हटले होते. तर अब्दुल कलाम आझाद यांनी सुद्धा टिपू सुलतान विषयी असेच वक्तव्य केले होते. त्यांना भाजपने राष्ट्रपतीपदाचे उमेदवार केले. हा भाजपचा दुटप्पीपणा असल्याचा आरोप त्यांनी केला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर