ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

बंगालमध्ये ममता दीदींची ‘मुघलशाही’ संपणार! त्या घरी जाणार- चंद्रेशखर बावनकुळे:देवस्थान इनामी जमिनींचा प्रश्न सुटणार, सरकार नवा कायदा आणण्याच्या तयारीत

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पश्चिम बंगालमध्ये यंदा विक्रमी मतदान झाले असून हे मतदान ममता बॅनर्जी यांच्या विरोधातील जनक्षोभ दर्शवते. मुघलशाही पद्धतीने काम करणाऱ्या ममता बॅनर्जी आता घरी जाणार हे निश्चित आहे, अशा शब्दांत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पश्चिम बंगालच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. नागपूर येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्यातील पाणीटंचाई आणि देवस्थान जमिनींच्या कायद्याबाबतही महत्त्वपूर्ण माहिती दिली. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील असा काही भाग आहे जिथे दुष्काळी परिस्थितीमध्ये पाणी कमी पडत असते. त्या परिसरात जलसाठे कमी आहेत. त्या परिसरात काळजी घ्यावी लागते. यावर काय उपाययोजना करता येतील आणि जनतेला कसे पाणी मिळेल यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. जलसाठे खाले करणं, बंधाऱ्यांना पाणी अडवणे, रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे, असे अनेक उपाय योजना आपण सर्वच जिल्हाधिकाऱ्यांना उपाययोजना सूचवल्या आहेत. जलजीवन मिशनमध्ये काही निधीची कमतरता होती पण आता त्यातून मार्ग निघाला आहे. जनतेने पाणी जपून वापरावे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, जलसाठे जास्तीत जास्त मजबूत करणे, पाणी जास्त खर्च होणार नाही याची काळजी घेणे, पाण्याची थोडी कपात करणे असे उपाय करणे गरजेचे आहे. पाणी वाहून जाण्यापेक्षा ते पाणी थांबवणे आणि जिरवणे याकडे सरकारवे लक्ष आहे. यावर्षी पाणी जपून वापरणे गरजेचे आहे त्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील जनतेने पाणी जपून वापरावे, असे आवाहन आम्ही यापूर्वीच केले आहे. यासाठी मी नागपूर आणि अमरावतीची बैठक घेतली आहे. सर्वच जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीवर मुख्यमंत्र्यांचे लक्ष आहे. इनामी जमीनीसाठी कायदा असावा चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, देवस्थान इनामी जमीनाचा वाद एक कायद करत संपवण्याची गरज आहे. साडेचार लाख हेक्टरच्या वर जमीनी आहेत. देवस्थानाचे हक्क काय आहेत? कुळाचे हक्क काय आहेत आणि वहिवाटदाराचे हक्क काय आहेत? याबद्दलचा कायदा करण्याचा विचार सरकारचा आहे. दोन ते 3 दिवसांमध्ये हा कायदा महसूल खात्याच्या बेवसाईटवर टाकण्यात येणार आहे. जेणेकरुण कोणाला काही मत मांडायचे असेल ते मत मांडता येईल. मग यावर जुलै महिन्यात होणाऱ्या अधिवेशनात आम्ही त्यावर चर्चा करणार आहोत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर