ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

टिपू सुलतानची छत्रपती शिवरायांसोबत तुलना करणाऱ्यांना भर चौकात फाशी द्या:मतांच्या राजकारणासाठी इतक्या नीच थराला जाणार का?- गोपीचंद पडळकर

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


टिपू सुलतानची छत्रपती शिवरायांसोबत तुलना करणाऱ्यांना भर चौकात फाशी द्यायला हवी, असे म्हणत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर निशाणा साधला आहे. तर मतांच्या राजकारणासाठी तुम्ही कुठे चालला आहात? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. गोपीचंद पडळकर म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करण्याचा काही विषयच नाही. ज्याने हजारो हिंदूंची हत्या केली आहे त्यांची तुलना तुम्ही शिवरायांशी करत आहात इतके नीच राजकारण सुरू आहे.मताच्या राजकारणासाठी तुम्ही कुठे चालले आहात, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत तु्म्ही इतक्या नीच लोकांची तुलना करतात परत त्यावर आंदोलने करतात हे शोभनीय नाही. आता निवडणूक होऊन गेली 2029 मध्ये निवडणूक आहे, आता असे वक्तव्य का करत आहात? असा सवाल पडळकरांनी केला आहे. राष्ट्रवादीवर मी बोलू शकत नाही गोपीचंद पडळकर म्हणाले की, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विलीनीकरण हा त्यांच्या दोन्ही पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यावर त्यांचे नेते बोलू शकतील मी त्यावर काही बोलू शकत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एकनाथ शिंदेंची मुळ शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी आहे. त्यामुळे या विलीनीकरणाचा काही फरक पडणार नाही. अजित पवार यांचे विमान अपघातात झालेले हे निधन अत्यंत दुर्दैवी आहे. त्यावर कुणी शंका निर्माण करत असेल तर त्यावर यंत्रणा स्पष्टीकरण देतील. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले असून महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी अनेक कामे केली आहेत. टिपू सुलतान काही राष्ट्रपुरुष नाही आमदार पडळकर म्हणाले की, शिवाजी महाराज यांनी जे काम केले ते संपूर्ण जगाला माहिती आहे, ते काही पक्षाचे राजकारण आहे का? शिवाजी महाराज देशाची अस्मिता आणि स्वाभिमान आहेत. त्यामुळे असे जे कोणी बोलत आहे, त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. जनता त्यांना वेळोवेळी योग्य जागा दाखवते. टिपू सुलतान काही राष्ट्रपुरुष नाही. सार्वजनिक ठिकाणी असलेले त्यांचे फोटो काढण्यात यावे. त्याचे नाव चौकाला देणं थांबवले पाहिजे. काँग्रेसची विचारधाराच ही राहिलेली आहे म्हणून ते रसातळाला गेले आहेत. तुम्ही बायका-पोरांची नावे ठेवा आमदार पडळकर म्हणाले की, काँग्रेसमध्य सर्व जण ही शिवरायांच्या विचारांच्या उलट वागणारी लोकं आहेत. या लोकांना जोड्याने मारण्याची गरज आहे. तुम्ही पोरांची नावे ठेवा या सर्व लोकांच्या नावाने. बायकांची नावे बदलून घ्या तुम्हाला जास्त पुळका आला असेल तर.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर