ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

सत्तेत राहून शिंदेंविरोधात लढता येणार नाही, गणेश नाईकांनी स्वगृही परतावे:ब्रिटीशांशी लढताना भाजप-आरएसएसला कुठे खरचटले तरी का?- संजय राऊत

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


गणेश नाईक यांना एकनाथ शिंदेंविरोधातली लढाई सत्तेत राहून लढता येणार नाही. त्यांना पाठबळ मिळत नाही. ते म्हणताय की एक दिवस भ्रष्टाचार असाच सुरू राहिला तर एकनाथ शिंदे यांना कारागृहात जावे लागेल असे गणेश नाईक म्हणत आहे. पण त्यांना पाठबळ मिळताना दिसून येत नाही, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे, गणेश नाईकांना पाठबळ मिळताना दिसून येत नाही. संजय राऊत म्हणाले की, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे चिरंजीव कॅबिनेट मंत्र्यांवर कोरकडासारखे हल्ले करत आहेत, म्हणून माझे नाईकांना आवाहन आहे की तुमच्या हातापायात बेड्या टाकून तुम्हाला लढायला पाठवले आहे. तुम्ही स्वगृही आले पाहिजे आणि शिवसेनेतून ही लढाई सुरू केली पाहिजे. आरएसएस ब्रिटिशांविरोधात लढले का? संजय राऊत म्हणाले की, मालेगावच्या उपमहापौरांनी पुन्हा एकदा टिपू सुलतानचा फोटो लावला आहे. यासाठी भाजपसारखी प्रवृत्ती जबाबदार आहे. ते मुस्लीम समाजाला असे निर्णय घेण्यासाठी प्रवृत्त करतात. मालेगावच्या उपमहापौर शान-ए-हिंद यांनी त्या फोटोबद्दल दिलगिरी व्यक्त करत फोटो उतरवला. यात आमच्या पक्षाच्या भूमिकेचा काय संबंध. महाराष्ट्रात ज्यांचे सरकार आहे त्यांनी आदेश काढावा. टिपू सुलतान हा 1799 साली इंग्रजांशी लढताना मरण पावला. काही लोकं त्याला पहिला स्वातंत्रसैनिक आहे असे म्हणतात. भाजप आणि आरएसएसने दाखवावे ते इंग्रजांच्याविरोधात लढले त्यांना कुठे खरचटले, शहीद झाले हे त्यांनी दाखवण्याची गरज आहे. ब्रिटीशांशी लढताना भाजप कुठे होते हे त्यांनी जाहीर करावे. अटल बिहारी वाजपेयी येथे होते हे त्यांनी जाहीर करावे. रामनाथ कोंविद टिपू सुलतानला राष्ट्रपुरुष म्हणाले संजय राऊत म्हणाले की, भाजपला काय काम, धंदा नाही. ते शेतकरी, जनता, नोकरदार, विद्यार्थी प्रश्नावर आंदोलन करत नाहीत. ट्रम्प यांच्याविरोधात कधी त्यांनी प्रश्न विचारले का? केवळ हिंदू-मुस्लीम द्वेषाचे राजकारण करण्याचे काम ते करतात. मालेगावच्या मनपात टिपू सुलतानचा फोटो लागला आणि विरोध होताच उतरला, तो प्रश्न तिथेच संपायला हवा होता, तो वाढवण्याची गरज नव्हती. पण भाजपने आणि त्यांच्या मित्रपक्षाने राज्यभरात आंदोलने केली. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज यांचा आहे हे सांगायला काही भाजपची गरज नाही. इतिहासात काही गोष्टींची नोंद आहे. ती भाजपला बदलता येणार नाही. त्यांनी टिपू सुलतानबद्दल आपल्या जुन्या भूमिका काय होत्या हे तपासले पाहिजे. भाजपने नेमलेले राष्ट्रपती रामनाथ कोंविद यांनी टिपू सुलतानचा राष्ट्रपुरुष म्हणून कसा गौरव केला. त्यांची भाषणे बघा कर्नाटकमधील. त्यांनी त्यांचा गौरव केला त्यावेळी त्यांना का नाही रोखले. टिपूच्या नावाने अनेक प्रकल्प केले तेव्हा का नाही रोखले. मुंबईच्या महापौर तावडे आणि अमित साटमांनी रोडच्या नावासाठी अनुमोदन दिले आहे. आता निवडणूक नाही उगाच राज्याचे वातावरण खराब करू नका.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर