ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

रोहित पवारांची सादरीकरणाद्वारे दोषींनाच मदत:मंत्री अनिल पाटील यांचा दावा; अजित पवारांच्या मृत्यूवर गोपनीयता बाळगण्याचा सल्ला

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीवरून सध्या राजकीय आरोप-प्रत्यारोप तीव्र झाले आहेत. अशातच आमदार अनिल पाटील यांनी आमदार रोहित पवारांचे नाव न घेता त्यांच्यावर गंभीर निशाणा साधला आहे. अपघाताबद्दल गोपनीयता न बाळगता वेगवेगळे व्हिडिओ आणि सादरीकरण (प्रेझेंटेशन) दाखवून एक प्रकारे दोषींना मदतच केली जात आहे, असा खळबळजनक आरोप अनिल पाटील यांनी केला आहे. अनिल पाटील म्हणाले की, जे कोणी या प्रकरणात दोषी असतील, त्यांना अशा सादरीकरणातून मदत होऊ शकते. त्यापेक्षा रोहित पवारांकडे जी काही माहिती असेल, ती त्यांनी थेट तपास यंत्रणांना द्यावी, जेणेकरून सत्य समोर येईल आणि संबंधितांवर कारवाई करता येईल. आम्ही भाजपसोबत आहोत, दबावाखाली नाही आमदार लवांडे यांच्या टीकेचा समाचार घेताना पाटील म्हणाले की, आम्हाला भाजपला खूश करण्याची कोणतीही गरज नाही. आम्ही एनडीएमध्ये भाजपसोबत आहोत ही वस्तुस्थिती आहे, पण याचा अर्थ असा नाही की आम्ही कोणाच्या दबावाखाली आहोत. अजित पवार हे कधीच कोणाच्या दबावाखाली आले नाहीत आणि ते कोणाला घाबरले नाहीत, आमच्या 4 नेत्यांवर टीका करणाऱ्यांनी सुनेत्रा पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्यासाठी त्यांनी काय दबावाखाली काम केले का? नाही आम्ही सर्व जण अजितदादांच्या परिवारासोबत निष्ठेने आहोत. डीजीसीएकडून अनियमिततेचा तपास सुरू तपासाबाबत माहिती देताना अनिल पाटील यांनी सांगितले की, बारामती पोलिस ठाण्यात या अपघाताची ‘एडी’ (Accidental Death) दाखल करण्यात आली आहे. विमानातील तांत्रिक दोष शोधण्यासाठी ‘एआयआयबी’ (AAIB) माहिती घेत आहे, तर डीजीसीएकडून अनियमिततेचा तपास सुरू आहे. तर कुठे घातपात झाला का हे शोधण्याचे काम सुद्धा सुरू आहे. आपण जो पर्यंत कन्क्लूजनपर्यंत पोहचत नाही तो पर्यंत गोपनियता ठेवली गेली पाहिजे ती या प्रकरणी ठेवली गेली आहे. यामध्ये अजून कोणी दोषी आहे का? हे अहवालातून आल्यानंतर पुढच्या कायदेशीर प्रक्रिया पार पाडता येतील. ..तर आम्हीच रस्त्यावर उतरू सुनेत्रा पवार यांनी स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली असून, सीआयडीचा तपास वेगाने सुरू आहे. जोपर्यंत तपास अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत गोपनीयता पाळणे गरजेचे असल्याचे पाटील यांनी सांगितले. जर अपघाताच्या अंतिम अहवालात काही त्रुटी आढळल्या, तर इतरांच्या आधी आम्हीच रस्त्यावर उतरू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर