ब्रेकिंग न्यूज
⚡ Supriya Sule: “तुझ्याशिवायची पहिली भाऊबीज…” अजितदादांच्या आठवणीत सुप्रिया सुळेंची भावूक पोस्ट, ”आम्हा बह… ✦ ⚡ CRIME : आईने पोटच्या 24 वर्षाच्या पोराला संपवलं, कोल्ड ड्रिंकमधून झोपेच्या गोळ्या दिल्या अन्… एका गोष्टीस… ✦ ⚡ Nagpur Crime : दोन महिन्यापूर्वी लग्न, दिवाळीला घरी आले; फराळ झाला अन् शिक्षक दामपत्याने घराच्या गॅलरीतच सं… ✦ ⚡ पांडवदेवीच्या पावन भूमीत आज गोवर्धन यात्रेचा भक्तीमय जयघोष! ✦ ⚡ दुष्काळामुळे मेंढपाळ व्यवसाय आर्थिक संकटात, अचानक घसरले दर, सोलापूरमधील भीषण वास्तव, Video ✦ ⚡ CRIME : ब्लँकेटमध्ये गुंडाळून उजनी धरणात फेकलं, विवाहित महिलेच्या हत्येचं गुढ अखेर उकललं! पोलिसांनी 2 तासात… ✦ ⚡ वाद होताच दोस्ती विसरला, पुण्यात तरुणाने थेट मित्राच्या अंगावर फेकलं ॲसिड, चिमुकलीसह 4 जणांना भाजलं ✦ ⚡ सासरच्यांकडून त्रास, पतीनंही दिली साथ; विवाहितेचं टोकाचं पाऊल, पाच दिवस मृत्यूशी झुंज अन्… ✦ ⚡ Diwali 2026: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केरसुनी का पूजतात? शास्त्र काय सांगतं? महत्त्व आणि परंपरा, Video ✦ ⚡ दिवाळीला सोलापूरच्या शेकऱ्यावर संकट, 4 एकर ऊस डोळ्यांदेखत जळून झाला खाक, लाखोंचं नुकसान
SP News Maregaon

मी उद्धव ठाकरेंसोबतच राहणार:डोळ्यांत पाणी आणून राजाभाऊ वाजेंकडून फुटीच्या चर्चांना पूर्णविराम, म्हणाले- पहिल्या दिवसापासून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील संभाव्य फुटीच्या चर्चांदरम्यान खासदार राजाभाऊ वाजे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत आपण पक्ष सोडणार नसल्याचे ठामपणे सांगितले. मी पक्ष सोडणार नाही, मी पहिल्या दिवसापासून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत आहे आणि पुढेही त्यांच्यासोबतच राहणार, अशा कडक शब्दांत वाजेंनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांच्या या विधानामुळे ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. मला कोणाचाही फोन नाही, मी पक्षात नाराज नाही माध्यमांशी संवाद साधताना राजाभाऊ वाजे म्हणाले की, माझा इतर कोणाशीही संपर्क झालेला नाही. मला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या गटातील कोणाचाही फोन आलेला नाही, ना मला कोणती ऑफर देण्यात आली आहे. मी पक्षात अजिबात नाराज नाही. मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत आलोय आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास मी कधीही तोडणार नाही. इतर खासदारांबाबत विचारले असता, मी इतर कोणाबद्दलही बोलू शकत नाही, पण मी स्वतः ठाकरेंसोबत ठाम आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेत राजाभाऊ वाजे भावुक शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील फुटीच्या चर्चांदरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत खासदार राजाभाऊ वाजे भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. बोलताना त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. १४ जून रोजी झालेल्या खासदारांच्या बैठकीचाही उल्लेख वाजे यांनी १४ जून रोजी झालेल्या खासदारांच्या बैठकीचाही उल्लेख केला. “त्या बैठकीला चार खासदार प्रत्यक्ष उपस्थित होते, तर पाच खासदार ऑनलाइन सहभागी झाले होते. पक्षात कोणतीही नाराजी नाही,” असे सांगत त्यांनी फुटीच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. “मी कार्यकर्ता म्हणून पक्षाशी एकनिष्ठ आहे आणि कुठेही जाणार नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले. पक्षातील कुणीही अधिकृतपणे जाण्याची भूमिका मांडली नाही- सावंत खासदार अरविंद सावंत यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. दिल्लीत बोलताना सावंत म्हणाले की, संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठी मी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिले आहे. आतापर्यंत आमच्या पक्षातील एकाही खासदाराने किंवा नेत्याने पक्ष सोडत असल्याचे आम्हाला सांगितलेले नाही. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या खासदारांच्या फुटीच्या चर्चांवर सावंत यांनी थेट भाष्य करत, पक्षातील कुणीही अधिकृतपणे जाण्याची भूमिका मांडलेली नसल्याचे स्पष्ट केले. ऑपरेशन टायगर सोपं नाही: शिवसैनिकांनी रक्त आटवून निवडून दिले, आता बेईमानी केली तर जनता सोडणार नाही; संजय राऊतांचा बंडखोरांना इशारा महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या ‘ऑपरेशन टायगर’वर अखेर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने मोठी पत्रकार परिषद घेऊन आपली आक्रमक भूमिका स्पष्ट केली आहे. अरविंद सावंत, अनिल देसाई, राजाभाऊ वाजे आणि संजय राऊत यांनी एकत्र येत बंडखोरी करणाऱ्यांना थेट इशारा दिला आहे. हा लोकशाहीचा केलेला तमाशा असून आता पुन्हा जर कोणी शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला, तर महाराष्ट्रातील जनता आणि शिवसैनिक गप्प बसणार नाहीत, असे नेत्यांनी ठणकावून सांगितले. महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या ‘ऑपरेशन टायगर’वर अखेर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने मोठी पत्रकार परिषद घेऊन आपली आक्रमक भूमिका स्पष्ट केली आहे. अरविंद सावंत, अनिल देसाई, राजाभाऊ वाजे आणि संजय राऊत यांनी एकत्र येत बंडखोरी करणाऱ्यांना थेट इशारा दिला आहे. हा लोकशाहीचा केलेला तमाशा असून आता पुन्हा जर कोणी शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला, तर महाराष्ट्रातील जनता आणि शिवसैनिक गप्प बसणार नाहीत, असे नेत्यांनी ठणकावून सांगितले. सविस्तर वाचा

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर