ब्रेकिंग न्यूज
Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक
SP News Maregaon

हाय प्रोफाइल केसेस हातळणाऱ्या ED अधिकाऱ्याची स्वेच्छानिवृत्ती!:नीरव मोदी, मेहुल चोक्सीसह नवाब मलिक अन् संजय राऊतांच्या केसचाही केला होता तपास

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सक्तवसुली संचालनालयाचे (ईडी) विशेष संचालक सत्यव्रत कुमार यांनी सेवेची 11 वर्षे शिल्लक असतानाच अचानक स्वेच्छानिवृत्ती जाहीर केल्याने प्रशासकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सध्या सिलीगुडी येथे कार्यरत असलेल्या सत्यव्रत कुमार यांनी यापूर्वी सुमारे 11 वर्षे मुंबईत सहसंचालक म्हणून काम पाहिले होते. मुंबईतील या प्रदीर्घ कार्यकाळात त्यांनी नीरव मोदी, मेहुल चोक्सी आणि पंजाब नॅशनल बँक घोटाळा यांसारख्या मोठ्या आर्थिक गैरव्यवहारांसह नवाब मलिक यांची अटक, तसेच अनिल देशमुख आणि संजय राऊत यांच्याशी संबंधित अशा अनेक ‘हायप्रोफाईल’ प्रकरणांचा तपास हाताळला होता. अशा संवेदनशील केसेस हाताळणारे अधिकारी म्हणून सतत चर्चेत असलेल्या कुमार यांनी अचानक स्वेच्छानिवृत्तीचा मार्ग का पत्करला, याविषयी आता विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. भारतीय महसूल सेवेतील (सीमाशुल्क आणि अप्रत्यक्ष कर) 2004 च्या बॅचचे अधिकारी असलेले सत्यव्रत कुमार हे 2013 मध्ये सक्तवसुली संचालनालयात (ईडी) सहसंचालक म्हणून मुंबईत रुजू झाले होते. मुंबई युनिटचे प्रमुख या नात्याने त्यांनी अनेक हाय-प्रोफाईल प्रकरणांचा तपास अत्यंत कौशल्याने हाताळला होता. त्यांच्या या महत्त्वपूर्ण योगदानामुळे 2022 मध्ये त्यांना या केंद्रीय तपास यंत्रणेत ऑक्टोबर 2026 पर्यंत काम करण्यासाठी विशेष मुदतवाढही देण्यात आली होती. मुंबईत प्रदीर्घ काळ सेवा बजावल्यानंतर, सप्टेंबर 2024 मध्ये त्यांची ईडीचे विशेष संचालक म्हणून कोलकाता येथे बदली करण्यात आली होती. पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याचा तपास सत्यव्रत कुमार यांच्या नेतृत्वाखाली सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अनेक मोठ्या आर्थिक घोटाळ्यांचा तपास केला. यामध्ये हिरे व्यावसायिक नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्याशी संबंधित तब्बल 12500 कोटी रुपयांचा पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळा, तसेच फरार उद्योगपती विजय मल्ल्याच्या बंद पडलेल्या ‘किंगफिशर एअरलाइन्स’शी निगडीत 9200 कोटी रुपयांच्या बँक कर्ज घोटाळ्याचा प्रामुख्याने समावेश होता. या अत्यंत गुंतागुंतीच्या आणि मोठ्या रकमेच्या प्रकरणांचा तपास करण्यात कुमार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक मोठ्या प्रकरणांमध्ये सत्यव्रत कुमार यांचा सहभाग याव्यतिरिक्त, ड्रग्ज माफिया इक्बाल मेमन ऊर्फ इक्बाल मिर्ची याच्यावरील दहशतवादी वित्तपुरवठा (टेरर फंडिंग) प्रकरण, ‘येस बँक’चे संस्थापक राणा कपूर यांच्याशी संबंधित ‘येस बँक-डीएचएफएल’ गैरव्यवहार आणि लाखो डॉलर्सच्या ‘महादेव ऑनलाइन सट्टेबाजी’ ॲप प्रकरणातील ‘पीएमएलए’ (PMLA) तपासातही सत्यव्रत कुमार यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. अनेक संवेदनशील गुन्ह्यांचा तपास यशस्वीपणे मार्गी लावूनही, 2025 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने त्यांचा ‘ईडी’मधील कार्यकाळ कमी करून त्यांना पुन्हा त्यांच्या मूळ विभागात म्हणजेच ‘केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळात’ परत पाठवण्याचा निर्णय घेतला होता.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर