ब्रेकिंग न्यूज
FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा … Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं PM Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ एका चुकीमुळे थांबणार पीएम-किसानचे ६,००० रुपये! 10 सेकंदांचा थरार! लिफ्टमध्ये वर जाताना अचानक बसले भूकंपाचे धक्के, नाशिकमधील घटना CCTV कॅमेऱ्यात कैद CRIME : गँगवॉरने नांदेड हादरलं! दोघं दबा धरून बसले, गाडी पेट्रोल पंपावर वळली अन् सांडला रक्ताचा सडा; इंद्रज…
SP News Maregaon

तांबे बारची माेड 300 रुपयांच्या घटीने;‎ साेन्याप्रमाणेच ‘टंच’ने शुद्धता तपासणी:खरेदी सराफातील दराने, पण विक्री एमसीएक्सनुसार‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शुद्ध म्हणून तांब्याचे बार सराफा बाजारात ‎जोरदार विकले गेले; पण ते पुन्हा तुम्हीच ‎खरेदी करणार का? अशी विचारणा झाली तेव्हा सराफांनी त्याची हमी घेतली नाही.‎भांडी व्यावसायिकांकडेच (कासार) एक ‎किलोच्या बारमागे किमान 300 रुपये घटीने‎ मोड द्यावी लागेल. मात्र सोने-चांदीप्रमाणे या ‎धातूची शुद्धता तपासता येईल, असे सराफा‎ व्यावसायिकांनी सांगितले.‎ पर्यायी धातू म्हणून अचानक तांबे समोर‎ आल्यानंतर त्याच्या किमतीत वाढ होऊन ते‎ थेट सराफा व्यावसायिकांकडे 1, 3 आणि 5 ‎किलोच्या बारमध्ये विक्रीसाठी उपलब्ध ‎झाले. भविष्यात त्यातही तेजी येईल असे ‎गृहीत धरून अनेकांनी गुंतवणूक केली आहे. ‎सोने-चांदीने जानेवारीत उच्चांक गाठला.‎सोलर, इलेक्ट्रिक वाहन उत्पादनात चांदीला‎ पर्याय म्हणून कॉपरचे (तांबे) दर वाढले.‎ खरेदी सराफातील दराने, पण विक्री एमसीएक्सनुसार‎ सध्यातरी तांब्याच्या बारवर अधिकृत‎ (काही अपवाद वगळता) शुद्धतेबाबत‎ खात्री दिलेली नाही. पण पारंपरिकपणे‎टंच काढून किंवा बीआयएस हॉलमार्क‎ केंद्रावर शुद्धता तपासता येऊ शकेल‎ अशी माहिती व्यावसायिकांनी दिली.‎ मोड एमसीएक्स दराने मिळते‎ गेल्या आठवड्यापासून मात्र तांब्याचे ‎मार्केट थंडावले आहे. 2 हजार रुपये‎ किलोला मिळणारा 1 किलोचा तांब्याचा ‎बार आता 1850 रुपयांना उपलब्ध आहे.‎ खरेदीसाठी फिजिकल मार्केटप्रमाणे दर ‎आहे. पण विक्रीसाठी एमसीएक्सवरील‎ (वायदा बाजार) दरानुसार 300 ते 500‎ रुपये घटीने ग्राहकांना परतावा मिळेल.‎
– तेजस कासार, व्यावसायिक, जळगाव‎ शुद्धता तपासण्याची पद्धत‎ वातावरणात दोन्ही धातू काळे ‎पडतात अशी चांदी व तांब्याची ‎शुद्धता तपासण्यासाठी पारंपरिक ‎अशास्त्रीय पद्धत आहे. तांबे व चांदी‎ मोकळ्या जागेवर दोन ते तीन दिवस‎ ठेवल्यास हवेच्या संपर्काने काळी‎ पडल्यास ते शुद्ध असते अशी‎ जाणकारांमध्ये मान्यता आहे.‎ एक किलोच्या तांबे बारची प्रथमच विक्री‎ गेल्या दीड महिन्यात शहरात 25 ते 30 सराफांसह कासार ‎व्यावसायिकांनी तांबे बार विक्री सुरू केली आहे. एक‎ किलो बारच्या स्वरूपात तांबे (कॉपर) प्रथमच विकले‎ जात असताना सराफा व्यावसायिक त्याच्या पुनर्खरेदीची ‎हमी घेत नाहीत. ते विक्रीसाठी जुनी भांडी घेणाऱ्या‎ दुकानावर त्याची मोड द्यावी लागेल, असे येथील सराफा ‎व्यावसायिक विश्वास लुंकड यांनी स्पष्ट केले आहे.‎

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर