ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

नाशिकच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा देणारा प्रकल्प:65.1 किमीचा रिंग रोड; 8000 कोटींच्या गुंतवणुकीचा राजमार्ग

4 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अलाईमेंट बदलावरुन चर्चेत आलेला अन् प्रशासनावर टीकेची झोड उठलेला 65.1 किमीचा बाह्य रिंग रोड हा नाशिकच्या विकासाला नवी दिशा देणारा ठरणार आहे. या रिंग रोडचे 2609 चौ. किमी इतके प्रभाव क्षेत्र तयार होणार आहे. यातून 8000 कोटींच्या गुंतवणुकीची अपेक्षा असून त्यातून रोजगार वाढीसह जिल्ह्याच्या जीडीपीलाही बुस्ट मिळेल. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाचे नियोजन सुरू आहे. सिंहस्थानिमित्ताने शहराच्या बाह्य बाजूने उभारण्यात येणाऱ्या 65.1 किमी रिंगरोडची प्रक्रिया अत्यंत वेगाने सुरु झाली आहे. जेथे जमीन मालकांची संमती मिळाली तेथे अलाईंमेंट निश्चितीसह भू-संपादन आणि मोजणीलाही सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी अलाईमेंट बदलल्याने नाराज असलेल्या जमीन मालकांचे प्रशासनाकडून मत परितवर्तन केले जात आहे. हारिंगरोड संबधित जमीन मालकांसह जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने किती महत्वाचा आहे, हे पटवून देण्याचाही प्रयत्नही होत आहे. महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्टक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ( एमएसआयडीसी) कडून हा रस्ता उभारला जात आहे. तर जिल्हा नियोजन समितीद्वारे जिल्हा विकासासाठी यारिंगरोडचा कसा उपयोग होईल, नाविन्यपुर्ण किंवा इतर विकासाच्या योजनांतून या रिंगरोडवरील विविध व्यावसाय कुठे सुरु केले जातील, यासाठीचा आराखडा तयार करत त्याची निश्चिती केली जात आहे.
येथे अधिक संधी नाशिक सिन्नर मुंबई-आग्रामहामार्ग इगतपुरी त्र्यंबकेश्वर दिंडोरी निफाड या भागाला अधिक संधी. रिंग रोडवर येईल मोठी गुंतवणूक हा रिंग रोड नाशिकच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा देणारा आहे. साधारणत: प्रकल्पपूर्तीनंतर या रिंगरोडवर 8000 कोटींची गुंतवणूक येईल,असा अंदाज आहे. – आयूष प्रसाद, जिल्हाधिकारी 25 गावांचा विकास आडगाव, देवळाली, विहीतगाव, पाथर्डी, मखमलाबाद या शहरातील भागातून रिंग रोड जात असल्याने येते वेगाने विकास. 2027 पर्यंत प्रकल्पपूर्ती; त्यानंतर उद्योग उभारणी मार्च 2027 पर्यंत रिंग रोड प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. प्रकल्पाच्या पूर्ततेनंतर, योग्य क्षमता आणि संधी उपलब्ध असलेल्या क्षेत्रांत तातडीने नवनवीन उद्योगांची उभारणी होईल. जिल्हा नियोजन समितीच्या वतीने जिल्ह्याच्या विकासासाठी या रिंग रोडचा कसा उपयोग करता येईल, नावीण्यपूर्ण किंवा विकासाच्या इतर योजनांमधून या रिंग रोडवर विविध व्यवसाय कुठे सुरू केले जातील, यासाठीचा आराखडा तयार केला जात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर