ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

जास्तच खुमखुमी असेल तर ठाण्यातून उभे रहा:खासदार श्रीकांत शिंदेंचे गणेश नाईकांना खुले आव्हान, म्हणाले- माझ्या नादी लागू नका

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


तुम्ही एकनाथ शिंदे यांच्या नादी लागा, पण माझ्या नादी लागू नका. जास्तच खुमखुमी असेल तर कल्याण किंवा ठाण्यातून माझ्याविरोधात खासदारकीला उभे राहा, असे खुले आव्हान शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी भाजप नेते व मंत्री गणेश नाईक यांना दिले आहे. गणेश नाईक यांनी केलेल्या टीकेला श्रीकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिंदे आणि नाईक यांच्यातील वाद पेटण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गणेश नाईक यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. त्यात आता श्रीकांत शिंदे यांनी एंट्री केली आहे. त्यानंतर वयावरून टीका करणाऱ्या श्रीकांत शिंदे यांना गणेश नाईक यांनी थेट इशाराच दिल आहे. माझ्या नादाला लागलात तर माजी खासदार करून टाकेन, असा इशारा नाईकांनी दिला आहे. यावर श्रीकांत शिंदे यांनी जोरदार पलटवार केला. श्रीकांत शिंदे यांनी गणेश नाईक यांच्यावर खरमरीत टीका केली आहे. ते म्हणाले, वयाच्या हिशोबाने आजार होत असतात. यामध्ये विसरभोळेपणा, चिडचिड, दिशाभूल असे आजार होत असतात. हे मी सांगू शकतो कारण मी डॉक्टर आहे, असा टोला शिंदे यांनी नाईकांना लगावला. पुढे बोलताना श्रीकांत शिंदे म्हणाले, मला माजी खासदार करण्याचे वक्तव्य त्यांनी करू नये. जर जास्तच खुमखुमी असेल तर ठाणे किंवा कल्याण लोकसभेतून, कुठूनही त्यांनी किंवा त्यांच्या मुलाने निवडणूक लढवून दाखवावी. मी त्यांच्यासमोर उभा राहील. लोकांनी मला तीन वेळ निवडून दिले आहे. तुम्ही शिंदे साहेबांच्या नादी लागा, मात्र डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नादी लागू नका. दरम्यान, महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिरात शिवलिंगाला दुग्धाभिषेक करून मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी शिवमंदिर कॉरिडॉर विकास कामांचा आवर्जून उल्लेख करत, आगामी काळात या भव्य कॉरिडॉरमुळे देशभरातील भाविकांसाठी हे मंदिर आकर्षणाचे केंद्र ठरेल आणि पर्यटनाला मोठी चालना मिळेल, असा ठाम विश्वास व्यक्त केला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर