ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

सरकारची ड्रग्ज बाबत ‘झिरो टॉलरन्स’ पॉलिसी:ड्रग्ज तस्करीत सापडल्यास कुरीयर कंपन्यांवरही कारवाई, मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्यातील अमली पदार्थांच्या वाढत्या विळख्यावर राज्य सरकारने आता अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला असून, केवळ तस्करच नव्हे तर त्यांना नकळत मदत करणाऱ्या कुरीयर कंपन्यांनाही आता कायद्याच्या कचाट्यात आणले जाणार आहे. “कुरीयर कंपन्यांनी पार्सल स्वीकारताना त्यात ड्रग्ज नाही याची खात्री केली पाहिजे. अन्यथा त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. कृत्रीम ड्रग्जसाठी लागणारी रसायने आयात करणाऱ्या कंपन्यांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. सरकारची ड्रग्ज बाबत ‘झिरो टॉलरन्स’ पॉलिसी आहे. पोलिस अधिकारी सहभागी सापडले तर थेट बडतर्फ केले जात आहे,” अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा सभागृहात बोलताना दिली. विधानसभेत कामाकाजादरम्यान प्रश्नोत्तराच्या अनेक सदस्यांकडून राज्यातील ड्रग्ज प्रकरणावरून प्रश्न उपस्थित केले. १६०० कोटींचे ड्रग्ज पकडले जात असतील, तर मुंबईत मेक्सिकोसारखी परिस्थिती होण्याची भीती व्यक्त केली. तर श्रीरामपूर मतदारसंघाचे काँग्रसचे आमदार हेमंत ओगले यांनी कुरीयरच्या माध्यमातून ड्रग्जची तस्करी केली जात असल्याचे सांगितले. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपरोक्त उत्तर दिले. नेमके काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ड्रग्जचा विषय हा महत्त्वाचा विषय आहे. यामध्ये कुरीयर्सवर देखील आपण कारवाई सुरू केली आहे. सगळ्या कुरीयरमध्ये राज्य सरकारची पथके पाठवलेली आहेत. कुरीयर कंपन्यांना सेन्सटायझ केले आहे. त्यांच्यावरही जबाबदारी टाकलीये की, त्यांनी जर तपासणी न करता अशाप्रकारचे कुरीयर डिलिव्हर केले. पाठवणारा तर दोषी असेलच, पण कुरीयरवाल्यांनाही त्यात दोषी पकडले जाईल, असा इशारा फडणवीसांनी दिला. सोशल मीडिया आणि ‘इन्स्टाग्राम’वर सरकारचा वॉच फडणवीस म्हणाले, अलिकडच्या काळात वेगवेगळ्या पद्धतीने ड्रग्जची वाहतूक केली जाते. आता इन्स्टाग्रामसारखी सोशल मीडिया ॲप देखील मार्केट प्लेस म्हणून वापरली जातात आणि त्याद्वारे डिलिव्हरी केली जाते. पण सगळ्या गोष्टींकडे सरकारचे लक्ष आहे. १६०० कोटींचे ड्रग्ज पकडले जात आहेत. याचे कारण म्हणजे दुर्दैवाने जे काही केमिकल ड्रग्ज तयार होतात, हे तयार करण्यासाठी कुठलीही मोठी व्यवस्था लागत नाही. त्यासाठी फॅक्टरी लागत नाही. एखाद्या छोट्याशा ठिकाणी ड्रग्ज तयार करतात. हे ड्रग्ज अतिशय घातक प्रकारचे आहेत. त्यावरही सरकाकडून कारवाई सुरू आहे. ड्रग्जसाठी लागणाऱ्या कच्च्या मालावर करडी नजर ड्रग्जसाठी जे साहित्य लागते, त्याचे लायसन्सेस कोणकोण आहेत? ते जो माल घेतात, तो बरोबर वापरतात की नाही? या सगळ्या गोष्टींकडे आपण लक्ष देऊन आहोत. यासंदर्भात सरकारची भूमिका १०० टक्के झिरो टॉलरन्सीची आहे. जिथे पोलिसवाले सापडतात, त्यांना आम्ही निलंबित नाही, तर बडतर्फ करत आहोत. ड्रग्जच्या प्रकरणातील कारवाईत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना दिले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर