ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

अजित पवारांनी कुटुंबासोबत घालवलेले क्षण:आई-वडील, बहिणी, मुलं, पवार परिवारासोबतचे फोटो; जय पवारांचा भावनिक व्हिडीओ

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला जवळपास महिना उलटत आला असला तरी त्यांच्या जाण्याची पोकळी अजूनही कायम आहे. 28 जानेवारी 2026 रोजी मुंबईहून बारामतीकडे निघालेल्या त्यांच्या खासगी विमानाचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती देण्यात आली. ही बातमी समोर येताच राज्यभरातून शोककळा पसरली. अनेकांना ही घटना मान्य करणे कठीण गेले. आजही हे खरंच घडलं का? हा प्रश्न समर्थकांच्या मनात आहे. 29 जानेवारी रोजी बारामतीतील विद्या प्रतिष्ठान कॉलेजच्या प्रांगणात त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो समर्थक बारामतीत दाखल झाले होते. संपूर्ण परिसरात शोकमय वातावरण होते. हजारो डोळ्यांत अश्रू आणि मनात अविश्वास दिसत होता. कार्यकर्ते, नागरिक आणि पवार कुटुंबीयांनी अत्यंत भावनिक वातावरणात त्यांना निरोप दिला. दरम्यान, सोशल मीडियावर अजित पवार यांचे अनेक जुने व्हिडीओ आणि फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. नेटकरी त्यांचे भाषणांचे, कार्यकर्त्यांसोबतचे आणि कुटुंबीयांसोबतचे क्षण शेअर करून श्रद्धांजली वाहत आहेत. अशातच त्यांचे धाकटे सुपुत्र जय पवार यांनी एक भावनिक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अजित पवार यांनी आपल्या कुटुंबासोबत घालवलेले क्षण, आई-वडील, बहिणी, मुलं आणि संपूर्ण पवार परिवारासोबतचे फोटो एकत्रित करण्यात आले आहेत. त्यात शरद पवार, पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांच्यासोबतचेही अनेक फोटो दिसतात. हा व्हिडीओ पाहताना अनेकांचे डोळे नकळत पाणावतात. अंत्यविधीच्या दिवशीचे क्षण, परिसरातील शांतता, हजारो चेहऱ्यांवरील वेदना आणि कार्यकर्त्यांच्या ओल्या डोळ्यांतून उमटणारे दुःख या सर्व भावना त्या व्हिडीओत जाणवतात. अजित पवारांचा शेवट अशा प्रकारे होईल, याची कल्पनाही कोणी केली नव्हती. त्यांच्या तरुणपणातील छायाचित्रे, लग्नसमारंभातील क्षण, कुटुंबासोबतचे आनंदी दिवस या सगळ्यांचा एकत्रित कोलाज तयार करून हा व्हिडीओ सादर करण्यात आला आहे. त्यामुळे समर्थक आणि नागरिक पुन्हा एकदा भावूक झाले आहेत. संबंधित कंपनीला कारणे दाखवा नोटीस दरम्यान, या दुर्घटनेनंतर विमान सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. अजित पवार यांना घेऊन जाणारे लीअरजेट 45 (व्हीटी-एसएसके) हे खासगी विमान बारामतीजवळ कोसळल्यानंतर नागरी उड्डाण महासंचालनालयाने विशेष सुरक्षा लेखापरीक्षण केले. या तपासणीत विमानाची उड्डाण तांत्रिक क्षमता, हवाई सुरक्षा आणि कार्यप्रणाली मंजुरी प्रक्रियेत अनेक गंभीर त्रुटी आढळल्याचे समोर आले. या पार्श्वभूमीवर संबंधित कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. चार विमानांच्या उड्डाणांवर तात्पुरती बंदी डीजीसीएने मेसर्स व्हीएसआर वेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या चार विमानांच्या उड्डाणांवर तात्पुरती बंदी घातली आहे. व्हीटी-व्हीआरए, व्हीटी-व्हीआरएस, व्हीटी-व्हीआरव्ही आणि व्हीटी-टीआरआय या विमानांना उड्डाणयोग्यता निकष पूर्ण होईपर्यंत परवानगी दिली जाणार नाही. ही सर्व विमाने लीअरजेट 40/45 जातीची असल्याचे सांगण्यात आले आहे. संबंधित त्रुटींची मूळ कारणे स्पष्ट करून अहवाल सादर करण्याचे आदेश कंपनीला देण्यात आले आहेत. दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक ती पावले एकीकडे अजित पवारांच्या आठवणींनी राज्यातील नागरिक आणि कार्यकर्ते भावूक होत असताना, दुसरीकडे या दुर्घटनेमागील कारणांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. विमान सुरक्षा आणि तांत्रिक प्रक्रियांतील त्रुटी दूर करण्यासाठी कठोर पावले उचलली जात आहेत. दादांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही, अशी भावना त्यांच्या समर्थकांत आहे. मात्र या घटनेतून धडा घेत भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर