ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

राज्यभर धुलिवंदनाचा सण उत्साहात:रंगोत्सवात नागरिकांचा जल्लोषपूर्ण सहभाग, ‘डीजे’च्या तालावर तरुणाई थिरकली

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


होळीच्या दुसऱ्या दिवशी आज अवघा महाराष्ट्र रंगांच्या उत्सवात न्हाऊन निघाला आहे. धुलिवंदनाचा सण आज राज्यभर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून, शहरांपासून ग्रामीण भागापर्यंत आनंदाची उधळण पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, यंदा सामान्यांसोबतच राजकीय दिग्गजही आपल्या कार्यकर्त्यांच्या रंगात रंगल्याचे विलोभनीय चित्र पाहायला मिळाले. राजकारणातील गट-तट विसरून अनेक नेत्यांनी आज कार्यकर्त्यांसोबत धुळवड साजरी केली. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये धुलिवंदनाचा उत्साह शिगेला पोहोचला होता. गृहनिर्माण सोसायट्या आणि सार्वजनिक चौकांमध्ये ‘बुरा ना मानो होली है’च्या घोषणा देत तरुणाईने डीजेच्या तालावर ठेका धरला. अनेक ठिकाणी पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात गुलाल उधळत मिरवणुका काढण्यात आल्या. महिला आणि मुलांनीही या रंगोत्सवात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
रावसाहेब दानवेंची खंजिरी आणि कलर सिलेंडर माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी भोकरदनमध्ये चक्क सिलेंडर हातात घेऊन कार्यकर्त्यांवर रंगांची फवारणी केली. एका कार्यकर्त्याने त्यांच्यासाठी गाणं गायलं असता, दानवे यांनीही खंजिरी वाजवत त्याला साथ दिली. भास्कर जाधवांनी नाचवली पालखी कोकणात सिमगा उत्सवाचा वेगळाच उत्साह असतो. आमदार भास्कर जाधव यांनी चिपळूणच्या तुरंबव गावी ग्रामदैवताची पालखी खांद्यावर घेऊन पारंपरिक नृत्य केले. खोतकरांकडून नैसर्गिक रंगांची उधळण जालन्यात माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी फुलांपासून तयार केलेल्या नैसर्गिक रंगांनी कार्यकर्त्यांसोबत सण साजरा केला, तर भोकरदनमध्ये आमदार संतोष दानवे यांनीही कार्यकर्त्यांच्या गराड्यात रंगोत्सव साजरा केला. संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे यांनी कार्यकर्त्यांसोबत होळी साजरी केली. नागपूरची ‘लठ्ठमार’ होळी नागपुरातील आनंदम आणि वृंदावन सोसायटीत मथुरा-वृंदावनच्या धर्तीवर ‘लठ्ठमार’ होळी खेळण्यात आली. महिलांनी हातात काठ्या घेऊन आणि पुरुषांनी ढाली (झाल) घेऊन खेळलेली ही होळी आकर्षणाचे केंद्र ठरली. सिंधुदुर्गात दीड दिवसांची धुळवड सिंधुदुर्गातील कुडाळमध्ये दीड दिवसांच्या धुलिवंदनाची परंपरा जोशात पाहायला मिळाली. राजकीय नेत्यांपासून लहानांपर्यंत सर्वच डीजेच्या तालावर थिरकले. पुण्यात मातीशी नातं सांगणारी ‘चिखल-होळी’ पुणे शहरात शिक्षणासाठी आलेल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी एका वेगळ्याच पद्धतीने सण साजरा केला. “मातीशी आमचं घट्ट नातं आहे,” असे सांगत या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी चिखलात मनसोक्त लोळून धुलिवंदनाचा आनंद लुटला. रंगांपेक्षाही मातीच्या सुगंधात न्हाऊन निघत या तरुणाईने ‘चिखल-राडा’ केला. सणासोबत चंद्रग्रहणही दरम्यान, आज 3 मार्च रोजी चंद्रग्रहण आहे. त्यामुळे धूलिवंदन साजरा करता येणार की नाही, रंग खेळणे जमणार की नाही, याबद्दल नाना शंका कुशंका व्यक्त केल्या जात होत्या. मात्र, चंद्रग्रहण असूनही याच दिवशी धूलिवंदनाचा दिवस साजरा करता येईल. रंग खेळता येईल, अशी माहिती पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर