ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

वेरूळच्या विश्वकर्मा लेणीत ‘किरणोत्सव’ सोहळा:सूर्यकिरणांनी उजळले भगवान बुद्धांचे मुखकमल, पाहा PHOTO

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ लेणी क्रमांक 10, ज्याला ‘विश्वकर्मा लेणी’ म्हणूनही ओळखले जाते, येथे दरवर्षी होणाऱ्या किरणोत्सवाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. प्राचीन स्थापत्यकलेचा आणि खगोलशास्त्राचा अद्भुत नमुना असलेल्या या सोहळ्याला देश-विदेशातील पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. सूर्य उत्तरायणात जात असताना, चैत्यगृहातील तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीवर पडणाऱ्या सूर्यकिरणांचा हा सोहळा अत्यंत नयनरम्य असतो. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात दरवर्षी या किरणोत्सवाचा अनुभव घेतला जातो. मूर्तीच्या मुखावर पडणाऱ्या सूर्यकिरणांमुळे संपूर्ण चैत्यगृह तेजोमय भासते आणि या क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी इतिहासप्रेमी आणि पर्यटक मोठ्या संख्येने वेरूळला येतात. यंदा 9 आणि 11 मार्चला हा सोहळा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. मात्र, 10 मार्चला मुख्य क्षण अनुभवण्याची संधी साप्ताहिक सुटीमुळे हुकली. त्यामुळे पर्यटक आणि इतिहासप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. वेरूळ लेणीतील किरणोत्सव स्थापत्यकलेचा, विज्ञानाचा आणि अध्यात्माचा त्रिवेणी संगम मानला जातो.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर