ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

होळी रे होळी!:धूलिवंदन मंगळवारी 3 मार्च रोजीच, चंद्रग्रहणाच्या काळातही साजरा करता येणार सण, पंचांगकर्ते मोहन दाते यांची माहिती

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


यंदा 3 मार्च रोजी चंद्रग्रहण आहे. त्यामुळे धूलिवंदन साजरा करता येणार की नाही, रंग खेळणे जमणार की नाही, याबद्दल नाना शंका कुशंका व्यक्त केल्या जात होत्या. मात्र, चंद्रग्रहण असूनही याच दिवशी धूलिवंदनाचा दिवस साजरा करता येईल. रंग खेळता येईल, अशी माहिती पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली. धूलिवंदनादिवशी मंगळवारी चंद्रग्रहणाचे वेध सकाळी सूर्योदयापासून सुरू होत आहेत. या वेदकाळामध्ये संपूर्ण दिवसभरामध्ये आपले नित्य नैमित्तिक पूजा, अर्चा अभिषेक, श्राद्ध इत्यादी सर्वे धार्मिक कृत्ये आपण करून शकतो, अशी माहितीही दाते यांनी दिली. पौर्णिमा प्रदोषकाळात नाही पंचांगकर्ते मोहन दाते म्हणाले की, ‘यावर्षी 2 मार्च रोजी सोमवारी होलिकादहन आहे. ते संध्याकाळी सूर्यास्तानंतर प्रदोषकाळात आपल्याला नेहमीप्रमाणे करायचे आहे. दुसऱ्यादिवशी पौर्णिमा प्रदोषकाळात नाही. तसेच या दिवशी चतुर्दशी आहे. त्यामुळे सूर्यास्तानंतर आपण नेहमीप्रमाणे भद्रा असतानासुद्धा होलिकादहन करायचे आहे.’ ग्रहण सूर्यास्तानंतर दिसेल पंचांगकर्ते मोहन दाते म्हणाले की, ‘मंगळवार 3 मार्च रोजी धूलिवंदनाचा दिवस आहे. या दिवशी चंद्रग्रहण आहे. हे चंद्रग्रहण ग्रसतोदित असल्याने सूर्यास्तानंतर संध्याकाळी 6 वाजून 48 मिनिटापर्यंत या काळामध्येत ते आपल्याला दिसणार आहे. त्याचा स्पर्श दुपारी 3 वाजून 20 मिनिटांनी आहे. स्पर्श आणि मध्य दिवसा असल्यामुळे हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही.’ ग्रहणकाळात काय कराल? पंचांगकर्ते मोहन दाते म्हणाले की, ‘चंद्रग्रहण फक्त संध्याकाळी सूर्यास्तानंतर अल्पकाळ आपल्याला दिसणार आहे. या अल्पकाळात काही ठिकाणी तीन ते चार मिनिट, तर काही ठिकाणी दहा, पंधरा, वीस मिनिटे दिसणार आहे. या काळात जेवढे शक्य असेल तेवढे स्नान, जप इत्यादी गोष्टी आपण कराव्यात.’ ग्रहणाचे मोक्षस्नान करा पंचांगकर्ते मोहन दाते म्हणाले की, ‘जर या वेळात काहीच शक्य झाले नाही, तर 6 वाजून 49 मिनिटांनंतर ग्रहणाचे मोक्षस्नान करावे. ग्रहणाचा वेध सकाळी सूर्याोदयापासून सुरू होत असल्याने आपण या वेधकाळामध्ये संपूर्ण दिवसभरामध्ये आपले नित्य नैमित्तिक पूजा, अर्चा अभिषेक, श्राद्ध इत्यादी सर्वे धार्मिक कृत्ये आपण करून शकतो.’ भोजनाचा निषेध सांगितला पंचांगकर्ते मोहन दाते म्हणाले की, ‘चंद्रग्रहणाच्या काळात फक्त या ठिकाणी भोजनाचा निषेध आपल्याला सांगितलेला आहे. तरीही जे अशक्त आहेत, आजारी आहेत, वृद्ध आहेत, बाल आहेत, गर्भवती स्त्रिया या सर्वांनी अकरा वाजेपर्यंत अन्न घेण्यास हरकत नाही. त्यानंतर मात्र संध्याकाळी मोक्ष झाल्यावर आपण भोजन करायचे आहे.’ रंग खेळू शकतो पंचांगकर्ते मोहन दाते म्हणाले की, ‘अर्थात या सर्व गोष्टी करता येत असल्यामुळे जो धूलिवंदनाचा दिवस आहे त्या दिवशी होळी, रंग खेळणे इत्यादी सर्व गोष्टी आपण करू शकतो. त्याला कोणताही निषेध नाही. धूलिवंदनाच्या दिवशी जरी चंद्रग्रहण असले तरी आपण होळीचा, रंगखेळण्याचा सण साजरा करू शकतो.’ त्यांनी धूलिवंदनाच्या साऱ्यांना शुभेच्छाही दिल्या. संबंधित वृत्त होलिका दहन 2 मार्च रोजी:कामदेवाने भंग केले होते शिवजींचे ध्यान, जाणून घ्या फाल्गुन पौर्णिमा आणि वसंतोत्सवाशी संबंधित मान्यता बांके बिहारीला रंग लागला, नाचत पोहोचले भक्त:वृंदावनमध्ये परदेशी लोकांनीही होळी खेळली, म्हणाले- खूप मजा आली होलाष्टक आजपासून सुरू:होलाष्टकाच्या दिवसांत विवाह, जानवे संस्कार यांसारखी शुभ कार्ये केली जात नाहीत, या वर्षी होलिका दहनावर चंद्रग्रहण

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर