ब्रेकिंग न्यूज
मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा … Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं
SP News Maregaon

DGCA +व्हिएसआर = AAIB:कोण कुणाला वाचवतंय तेच कळेना, मिटकरींचा अजित पवारांचे विमान झाडाला धडकलेच नसल्याचा दावा

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी रविवारी पुन्हा एकदा दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघाताविषयी एएआयबीने जाहीर केलेल्या अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. डीजीसीए, व्हिएसआर व एएआयबीमध्ये कोण कुणाला वाचवत आहे हेच कळत नाही. पण महाराष्ट्राला दुधखुळा समजण्याचे काम कुणीही करू नये, असे त्यांनी म्हटले आहे. अजित पवारांचे विमान झाडाला धडकून नंतर खाली कोसळल्याचा दावाही त्यांनी धुडकावून लावला आहे. अजित पवार यांचे गत 28 जानेवारी रोजी बारामती येथील एका विमान अपघातात निधन झाले. त्यानंतर काल या घटनेला 1 महिना पूर्ण झाल्यानंतर एएआयबीने (विमान अपघात तपास ब्यूरो) या घटनेशी संबंधित आपला प्राथमिक अहवाल जाहीर केला. या अहवालात अजित पवारांचे विमान प्रथम झाडाला धडकले आणि त्यानंतर खाली कोसळले असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार अमोल मिटकरी यांनी या अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मिटकरी आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, DGCA +VSR = AAIB कोण कुणाला वाचवतंय तेच कळेना. मात्र महाराष्ट्राला दुधखुळ समजु नका. अजित पवारांचे विमान झाडाला धडकले नाही अमोल मिटकरी यांनी आपल्या ट्विटमध्ये एक व्हिडिओही जोडला आहे. त्यात एएआयबीच्या अहवालातील अजित पवारांचे विमान झाडाला धडकून नंतर खाली कोसळल्याचा दावा फेटाळण्यात आला आहे. अजित पवारांचे विमान अचानक आडवे होऊन पडले आहे. हे विमान 200 ते 250 उंचीवर आडवे होताना कोणत्याही झाडाला धडकले नाही हे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे, असे या व्हिडिओत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे अजित पवारांचे विमान कोसळण्यापूर्वी झाडाला धडकल्याच्या एएआयबीच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आत्ता पाहू काय आहे AAIB च्या अहवालात? एएआयबीने आपल्या 22 पानी अहवालात म्हटले आहे की, बारामती विमानतळावरील कमी दृश्यमानता, व्हीएफआर (Visual Flight Rules) नियमांचे उल्लंघन, एअरफिल्ड अपुऱ्या सुविधा, स्वतंत्र MET सुविधेचा अभाव यामुळे ही विमान दुर्घटना घडली. विशेषतः अपघातावेळी हे विमान अगोदर झाडांवर कोसळले. त्यानंतर ते खाली पडून त्याला आग लागली, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. अजित पवारांच्या विमानाने लँडिंगच्या पहिल्या प्रयत्नानंतर गो अराऊंड केले. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात ते धावपट्टीच्या डाव्या बाजूला 50 मीटर अंतरावर कोसळले. अपघाताच्या काही क्षणापूर्वी कॉकपिटमधून ‘ओह शिट’ असा आवाज आला, असेही हा अहवाल सांगतो. रोहित पवारांचाही अहवालावर आक्षेप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही एएआयबीच्या अहवालावर सवाल उपस्थित केला आहे. प्राथमिक अहवालात AAIB ने कोणता प्राथमिक निष्कर्ष काढला? CID या अहवालाचा आधार घेऊन कसा तपास करणार आहे? या अहवालातील पान क्रमांक 4 वरील मुद्दा 5.1 मधील “Baramati Airfiled is situated in the Baramati District of the state Maharashtra” हे वाक्य AAIB ने हा अहवाल किती गांभीर्याने बनवला हे दाखवण्यासाठी पुरेसे आहे. मी मुंबईत यावर सविस्तर बोलेल, असे त्यांनी म्हटले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर