ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

मुंबई महापालिकेत राष्ट्रवादीची मोठी खेळी:भाजपला डावलून शिंदेंच्या शिवसेनेला दिला पाठिंबा, सत्तेच्या समीकरणात एन्ट्री!

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने एक महत्त्वपूर्ण राजकीय पाऊल उचलले असून, महापालिकेत आपल्या तीन नगरसेवकांचा स्वतंत्र गट नोंदवून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. महायुतीचा घटक पक्ष असूनही मुंबईत निर्माण झालेल्या विशेष राजकीय परिस्थितीमुळे राष्ट्रवादीने हा पवित्रा घेतला आहे. या निर्णयामुळे आता मुंबई महापालिकेत सत्तेच्या समीकरणात राष्ट्रवादीचा हा गट शिंदेंच्या शिवसेनेसोबत सक्रिय राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या राजकीय भूमिकेमागे निवडणुकीपूर्वीचे नाट्यमय संदर्भ आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपने नवाब मलिक यांच्या नावावरून घेतलेल्या आक्षेपामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला महायुतीमध्ये स्थान मिळण्यास अडचणी आल्या होत्या. परिणामी, राष्ट्रवादीला मुंबईत स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी लागली होती. निवडणुकीनंतर मात्र, राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा न देता थेट शिंदेंच्या शिवसेनेला साथ देण्याचे ठरवले आहे. भाजपच्या विरोधामुळे निर्माण झालेली दरी आणि स्थानिक राजकारणाची गरज यातून हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे. या पाठिंब्याच्या बदल्यात राष्ट्रवादी काँग्रेसला महापालिकेच्या विविध वैधानिक आणि विशेष समित्यांमध्ये मानाचे स्थान मिळण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेने राष्ट्रवादीला समित्यांमध्ये प्रतिनिधित्व देण्याचे आश्वासन दिले असून, त्या बदल्यात हे तीन नगरसेवक शिवसेनेच्या पाठीशी उभे राहणार आहेत. यामुळे मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेना युतीची सत्ता येणार असली, तरी राष्ट्रवादीच्या पाठिंब्यामुळे महापालिकेत शिंदेंच्या शिवसेनेची ताकद आणि सौदेबाजीची क्षमता अधिक वाढणार आहे. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार- एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे हा शब्दाचा पक्का आहे, लाडक्या बहिणींना लखपती केल्याशिवाय थांबणार नाही. लवकरच आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार, असे विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. कोल्हापूरच्या कागल येथे एका जाहीर सभेत ते बोलत होते. ज्या उमेदवाराच्या मागे महिला, त्याचा मत पेटीत नंबर पहिला. त्यामुळे दर महिन्याला ओवाळणी देणारा हा भाऊ आज विनंती करायला आला असल्याचे यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले. वाचा सविस्तर

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर