ब्रेकिंग न्यूज
Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक
SP News Maregaon

विद्यार्थ्यांनी रिल्स आणि रिअल मधील फरक समजून घ्यावा:नातेपुते येथील दाते प्रशालेत विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व विकास व करिअर मार्गदर्शन सोहळा‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


डॉ. बा. ज. दाते प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, नातेपुते येथे इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘व्यक्तिमत्व विकास व करिअर मार्गदर्शन’ या विषयावर विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सोलापूर येथील प्रख्यात मार्गदर्शक प्रा. आय. आय. मुजावर यांनी विद्यार्थ्यांना विविध पैलूंवर मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी रिल्स आणि रिअल यातील फरक समजून घेतला पाहिजे, असे प्रतिपादन आय. आय. मुजावर यांनी केले. या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. पुढे म्हणाले की, “आय अॅम विनर, आय अॅम चॅम्पियन” हा मंत्र मनाशी बाळगल्यास कोणतेही यश प्राप्त करणे अवघड राहणार नाही. समाजात आनंद निर्माण करण्यासाठी प्रयत्न करा. तंत्रज्ञान हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असले तरी त्याचा योग्य वापर करणे महत्त्वाचे आहे. मोबाइलचा मालक न बनता त्याला आपला गुलाम बनवा, असे आवाहन त्यांनी केले. पुढे बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वास वाढवण्याचा सल्ला दिला. “माझी निर्मिती ही सर्वोत्कृष्ट निर्मिती आहे” ही भावना मनात जोपासा. डॉक्टर, इंजिनिअर बना; मात्र त्याआधी चांगला माणूस बना. विचाराने गरीब असणाऱ्या व्यक्तीकडून मोठी कामगिरी घडत नाही. त्यामुळे पैशाने नव्हे तर विचाराने श्रीमंत बना, असे ते म्हणाले. विद्यार्थ्यांनी यावेळी संस्थेचे चेअरमन बाहुबली चंकेश्वरा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, चांगला व्यक्ती बनण्यासाठी मनामध्ये चांगले विचार असणे आवश्यक आहे. चांगल्या विचारांसाठी सात्विक आहार महत्त्वाचा असून, जसा आहार तसा विचार निर्माण होतो. त्याचा परिणाम व्यक्तीच्या कुटुंब, करिअर आणि जीवनावर होत असतो. त्यामुळे योग्य आहार व उत्तम विचारांची जोपासना करावी, असे मत त्यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी बौद्धिक, शारीरिक, भावनिक आणि आध्यात्मिक व्यक्तिमत्व विकासावर भर द्यावा. दिवसाचे नियोजन करावे, विविध करिअरच्या संधींचा शोध घ्यावा आणि पाहिलेली स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्नशील राहावे. विचारातून भावना, भावनेतून कृती आणि कृतीतून सवय निर्माण होते. त्यामुळे स्वतः इतरांसाठी आनंदाचा स्रोत बना, असा मोलाचा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. या कार्यक्रमास नातेपुते एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन बाहुबली चंकेश्वरा, व्हाईस चेअरमन संतोष काळे, प्रशाला समितीचे सभापती व संचालक अरविंद पाठक, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य नवनाथ बांगर, पर्यवेक्षक अंकुश नागरगोजे यांच्यासह सर्व शिक्षक-शिक्षिका, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभिजीत म्हामणे यांनी केले. सूत्रसंचालन मनीषा काकडे यांनी केले तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक अंकुश नागरगोजे यांनी मानले. उत्तम विचारांची जोपासना करण्याचे आवाहन

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर