ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

दिव्य मराठी विशेष‎:मराठवाड्यात 14 टक्केच पीककर्ज वाटप‎, मागील वर्षीच्या तुलनेत केवळ 3 टक्के जादा कर्ज वाटप‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मराठवाड्यात जून महिना उजाडल्यानंतरही‎ बँकांकडून केवळ 14 टक्केच पीककर्ज वाटप‎ झाले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत कर्ज वाटप‎ 3 टक्के अधिक आहे तरीही नेहमीप्रमाणे गती‎संथच असल्याचे चित्र आहे. पेरणीच्या तोंडावर ‎आता शेतकऱ्यांना तातडीने पीक कर्ज वाटप‎ करावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.‎ मराठवाड्यात यावर्षी सुमारे 49.33 लाख ‎हेक्टरवर खरीप पेरणीचा अंदाज आहे. यामध्ये‎ प्रामुख्याने सोयाबीनची 26.11 लाख हेक्टर‎ क्षेत्रावर पेरणी होण्याचा अंदाज आहे. त्या‎पाठोपाठ 12.80 लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची‎ लागवड होण्याचा अंदाज आहे. याशिवाय तूर,‎उडीद, मूग, बाजरीची सुमारे 4.30 लाख ‎हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज आहे. मका ‎3.55 लाख हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज‎ आहे. छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यात ‎मका पिकाचे क्षेत्र अधिक असणार आहे.‎ दरम्यान, या वर्षी मराठवाड्यात आठही‎ जिल्ह्यांमधून 11188 कोटी रुपयांचे पीककर्ज ‎वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यानुसार ‎जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत 3306 कोटी, ‎राष्ट्रीयीकृत बँकेमार्फत 5821 कोटी, महाराष्ट्र ‎ग्रामीण बँकेमार्फत 2061 कोटी रुपयांचे कर्ज‎ वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. मात्र प्रत्यक्षात‎ आतापर्यंत केवळ 1576 कोटी रुपये, म्हणजेच ‎केवळ 14.09 टक्केच कर्ज वाटप झाले आहे.‎ मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमधून‎ बँकांकडून कर्ज वाटपाचे काम संथगतीने सुरू‎ आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक‎ अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. मराठवाड्यात मागील वर्षी या‎ कालावधीत 1395 कोटी रुपयांचे कर्ज वाटप ‎झाले होते. त्याची टक्केवारी 11.05 टक्के होती.‎ थेट प्रश्न‎ सुजित झोडगे, जिल्हा अग्रणी बँक, हिंगोली‎ Q. कर्ज वाटपाची गती संथ का आहे?‎ A. तसे म्हणता येणार नाही. मागील वर्षीच्या‎तुलनेत कर्ज वाटप तीन टक्के अधिक आहे.‎ Q. या वर्षी किती कर्ज वाटप होणार का?‎ A. मागील वर्षी मराठवाड्यात 69 टक्के कर्ज‎वाटप झाले आहे. मात्र या वर्षी 75 टक्क्यांपेक्षा‎अधिक कर्ज वाटप होईल.‎ Q. कर्ज वाटपाचे नियोजन कसे आहे?‎ A. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सुलभतेने‎कर्ज मिळावे यासाठी मराठवाड्यातील सर्वच‎जिल्ह्यांतून प्रयत्न होत आहेत. काही ठिकाणी‎प्रत्येक गावामधून कर्ज वाटपाचे शिबिर‎आयोजित केले जात आहे.‎ लातूर 271 कोटींचे (237 कोटी) कर्ज वाटप‎झाले. धाराशिव 225 कोटी (194 ), बीड 180‎कोटी (152), नांदेड 204 कोटी (86), छत्रपती‎संभाजीनगर 392 कोटी (361), जालना 160‎कोटी (199), परभणी 95 कोटी (81). हिंगोली‎ जिल्ह्यात या वर्षी 46 कोटींचे कर्जवाटप झाले‎आहे. मागील वर्षी 82 कोटींचे कर्ज वाटप झाले.‎ 1.88 लाख शेतकऱ्यांना लाभ‎ मराठवाड्यात आतापर्यंत 1.88 लाख शेतकऱ्यांना‎1576 कोटींचे कर्ज वाटप झाले. जिल्हा मध्यवर्ती‎बँकेकडून 1.24 लाख शेतकऱ्यांना 752 कोटी,‎राष्ट्रीयीकृत बँकेकडून 31413 शेतकऱ्यांना 550‎कोटी, महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून 32316‎शेतकऱ्यांना 273 कोटींचे कर्ज वाटप झाले.‎

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर