ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

व्यापारी करारात भारत अमेरिकेचा गुलाम:सीमेवर युद्ध असताना ‘विश्वगुरू’ गप्प का? इराणचे खामेनी मारले जाणे धक्कादायक- संजय राऊत

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


व्यापारी करारात भारत अमेरिकेचा गुलाम झाला आहे. जर अमेरिकेने पाकिस्तान-अफगणिस्तानच्या युद्धात ट्रम्प पाकिस्तानला मदत करत आहे. पाकिस्तानला अर्थसाह्य, मिसाईल आणि शस्त्र पुरवण्याचे काम अमेरिकेकडून सुरू आहे. ट्रम्प यांनी पाकिस्तानच्या शौर्याचे कौतुक केले आहे, यावर भारताच्या परराष्ट्र खात्याने साधे निषेधाचा शब्द ही काढला नाही. भारताचे परराष्ट्र धोरण काय आहे? भारताची जागतिक भुमिका काय आहे? फक्त परदेशात जाऊन नेत्यांना मिठी मारत फोटो भारतात पाठवायचे हेच धोरण आहे का असे म्हणत उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले की, इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांची हत्या ही भारतासाठीसुद्धा धक्कादायक आहे. आपल्या देशाने युद्धासंदर्भात भूमिका घेणं गरजेचे आहे. आपल्या देशाच्या सीमेवर पाकिस्तान-अफगानिस्तान युद्ध सुरू आहे. तर इराण-दुबई, इराण-इस्त्रायल असेल हे युद्ध भारताच्या दाराशी आलंय, मोठी आर्थिक झळ बसू शकते. यायुद्धामुळे भारताच्या सीमेवर भुगोल बदलण्याची शक्यता आहे तरी सुद्धा मोदी इस्त्रायलला गेले दुसऱ्यादिवशी इराणमध्ये गेले त्यामुळे जागतिक लेव्हलवर भारताची नाचक्की झाली आहे. विश्वगुरू मोदी यांनी भूमिका घेतली पाहिजे संजय राऊत म्हणाले की, अखाती राष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी भारतीय लोक अडकून पडले आहेत. तिथल्या विमानतळावर हल्ले झाले आहेत, परराष्ट्र कसे हे सर्व सोडवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. इराणचे सर्वोच्च नेते खामेनींचे संपूर्ण कुटुंब मारले ते अत्यंत चुकीचे आहे. अमेरिका-इस्त्रायल यांनी मिळून इराणवर हल्ला केला आहे. त्यावर भारताने भूमिका घेतली पाहिजे. गुंडगिरी करत देश ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशी परिस्थिती उद्या जगातील कोणत्याही राष्ट्रावर येऊ शकते. अमेरिका-इस्त्रायल एकत्र येऊन कोणालाही उचलून आपल्या जेलमध्ये टाकून मारू शकतात. यामुळे विश्वगुरू मोदी यांनी भूमिका घेतली पाहिजे. सरकारने याचे उत्तर द्यावे संजय राऊत म्हणाले की, इराणने आपल्याला अनेक वेळा मदत केलेली आहे. काश्मीरच्या मुद्द्यावर खुलेपणाने भारताच्या बाजूने उभा राहिलेला देश म्हणजे इराण आहे. ते मैत्रीमुळे कमी भावात तेल देत होते. आपले आणि त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहे. भारत-पाक युद्ध जर ट्रम्प यांनी थांबवले तर इराणला वाचवण्याची जबाबदारी मोदींची होती. पण इराणमध्ये बॉम्ब हल्ले झाले, त्यावेळी भारताचे नेतृत्व काय करत होते? मोदी हे युद्ध का थांबवू शकले नाही, याचे उत्तर सरकारने द्यावे. त्यावर रोहित पवार बोलतील संजय राऊत म्हणाले की, अजित पवार यांच्या अपघाताबद्दल रोहित पवार अभ्यासपूर्वक भूमिका मांडत आहेत. त्यांनाच ती भूमिका मांडू द्या.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर