ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

गतवर्षीपेक्षा “महान’मध्ये 8% जास्त जलसाठा:पाणीपातळी 23.09 टक्क्यांवर, पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शहरासह मूर्तिजापूर, बोरगाव मंजू, अकोला एमआयडीसी, महान मत्स्यबीज केंद्र तसेच खांभोरा – उन्नई ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गत येणाऱ्या ६४ गावांचा पिण्याच्या पाण्याचा मुख्य आधार असलेल्या महान धरणात सध्या २३.०९ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरणात सुमारे ८ टक्के अधिक पाणीसाठा असूनही पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पावसाने पाठ फिरवल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी महान धरणात एकूण पाच व्हॉल्व बसवले आहेत. यापैकी तीन व्हॉल्व अद्याप पाण्याखाली असून दोन व्हॉल्व पाण्याबाहेर उघडे पडले आहेत. धरणातील उपलब्ध जलसाठा अकोल्याच्या पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित ठेवण्यात आला असून सध्या शेतकऱ्यांसाठी नदीपात्रात पाणी सोडणे बंद आहे. तीव्र उन्हामुळे धरणातील पाण्याचे बाष्पीभवन होत असून पाणीपातळी दिवसेंदिवस घटत आहे. पावसाचा अंदाज व धरणातील जलसाठा लक्षात घेता नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन महान पाटबंधारे विभागाने केले. गतवर्षी म्हणजे ११ जून २०२५ रोजी महान धरणातील पाणीपातळी ३४०.२३ मीटर होती. त्यावेळी धरणात १२.९२१ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा म्हणजेच १४.९६ टक्के जलसाठा उपलब्ध होता. तर यावर्षी ११ जून २०२६ रोजी धरणातील पाणीपातळी ३४१.३१ मीटरवर असून १९.९४० दशलक्ष घनमीटर म्हणजे २३.०९ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरणात सुमारे ८ टक्के अधिक पाणी आहे. गतवर्षी १२.९२१ घ.मी. साठा

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर