ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

मारेगाव तालुक्यात थरारक अपघात! व्हीफास लावलेला ट्रॅक्टर पलटी; २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

7 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मार्डी येथील घटना

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव तालुक्यातील मार्डी येथे दि. १ मार्च २०२६ रविवारी सायंकाळी ७ वाजता भीषण अपघात घडून २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शेतातून काम आटोपून परत येत असताना व्हीफास लावलेला ट्रॅक्टर अचानक पलटी होऊन खोल नालीत कोसळल्याने चालक ट्रॅक्टरखाली दबला गेला.

मृत युवकाचे नाव अभय बंडू येरमे (वय २१, रा. मार्डी, ता. मारेगाव) असे असून तो कष्टकरी कुटुंबातील होता. अभय हा Massey Ferguson कंपनीच्या ट्रॅक्टरने शेतातील काम उरकून मजरा मार्गे गावाकडे परत येत होता.

दरम्यान, महावितरण कार्यालयाजवळील धोकादायक वळणावर ट्रॅक्टरचा अचानक तोल गेला आणि वाहन रस्त्यालगत पलटी होऊन खोल नालीत कोसळले. ट्रॅक्टरखाली दबल्या गेल्याने अभयचा जागीच मृत्यू झाला. अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली; मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

घटनेची माहिती मिळताच मारेगाव पोलीस स्टेशन येथील पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. संबंधित प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे मार्डी गावावर शोककळा पसरली आहे. तरुण, मेहनती आणि कुटुंबाचा आधारस्तंभ असलेल्या अभयच्या आकस्मिक निधनाने गावात शोक व्यक्त केला जात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर