ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

मुंबईत जवळपास 50 टक्के नालेसफाईचे काम पूर्ण:31 मेपर्यंत काम पूर्ण करण्याचे बीएमसीला निर्देश– आमदार अमित साटम

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पावसाळ्यातील पूरस्थितीमुळे मुंबईकरांना होणारा त्रास कमी करण्यासाठी मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी सांगितले की, मुंबईतील जवळपास 50 टक्के नालेसफाईचे काम पूर्ण झाले असून उर्वरित काम 31 मेपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश बीएमसीला देण्यात आले आहेत.

आमदार साटम यांनी पश्चिम उपनगरांतील बांद्रा, जुहू, अंधेरी (पश्चिम), वर्सोवा आणि गोरेगाव येथील नाला सफाई कामांची पाहणी केली. यावेळी मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा, महापालिकेचे सभागृह नेते गणेश खनकर, अतिरिक्त महापालिका आयुक्त अविनाश ढाकणे, पर्जन्य जलवाहिनी विभागाचे अधिकारी, महापालिका उपायुक्त, स्थानिक वॉर्ड अधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते.

मुंबईकरांचा त्रास कमी करणार अमित साटम म्हणाले की, मुंबईकरांना आगामी पावसाळ्यात कमीत कमी त्रास व्हावा आणि 31 मेपर्यंत 100% नाला सफाईचे काम पूर्ण व्हावे, या उद्देशाने ही पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. सध्या सुमारे 40–50% नालेसफाईचे काम पूर्ण झाले असून उर्वरित काम या महिन्याच्या अखेरीस पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत, असे आमदार अमित साटम यांनी सांगितले.

कचरा समुद्रात जाण्यापासून रोखणार अमित साटम म्हणाले की, पाहणीदरम्यान ज्या ठिकाणी नद्या आणि नाले समुद्राला मिळतात, त्या सर्व ठिकाणी कचरा समुद्रात जाण्यापासून रोखण्यासाठी ट्रॅश बूम बसवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. महापालिका प्रशासनावर देखरेख ठेवण्यासाठी आणि कामे वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी पालकमंत्री, महापौर, उपमहापौर, सभागृह नेते आणि आमदार वेगवेगळ्या वेळी विविध ठिकाणी पाहणी करत असल्याचेही साटम यांनी सांगितले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर