ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

राज्यसभेसाठी मविआचा एकच शिलेदार मैदानात उतरणार!:आंतरराष्ट्रीय राजकारणात काँग्रेस आजही मोदींपेक्षा वरचढ- संजय राऊत

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


आंतरराष्ट्रीय राजकारणात काँग्रेसला अजूनही तितकेच महत्त्व आहे. कदाचित ते नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा जास्त असेल. इराण-इस्रायल युद्धासंदर्भात भारताने भूमिका मांडणे गरजेचे आहे. इराणसारख्या देशाच्या राष्ट्रप्रमुखांची हत्या होते आणि भारताकडून शोक संवेदना ही व्यक्त होत नाही. पाकिस्तानच्या पंतप्रधानांची हत्या होते तेव्हाही भारत शोक व्यक्त करतो. त्यांच्या अंत्यसंस्कारामध्येही भारत जातो. पण इराणबद्दल काही बोलायला तुम्ही का घाबरत आहात? असा सवाल राऊतांनी केंद्र सरकारला केला आहे, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, राज्यसभेची जागा ही मविआची आहे. मविआ एकत्र असेल तेव्हाच ही जागा निवडून येईल. शिवसेना हा विधिमंडळात सर्वात मोठा पक्ष आहे. आमचे 20 आमदार आहेत तर 16 काँग्रेसचे आमदार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्याकडे 10 आमदारांचे संख्याबळ आहे. आम्ही जेव्हा एकत्र राहु तेव्हा एक जागा निवडून येईल. आम्ही एकत्र राहणे गरजेचे आहे. उद्या उमेदवारी अर्ज भरण्याचा महत्त्वाचा दिवस आहे. काल जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे हे उद्धव ठाकरेंना भेटले त्यांच्यामध्ये प्रदीर्घ काळ चर्चा झाली आज सायंकाळपर्यंत यरा संदर्भात निर्णय जाहीर होईल. कोणताही एक पक्ष या संदर्भात निर्णय जाहीर करू शकत नाही, कारण आघाडी आहे. सर्व चर्चा झाल्या आहेत. पण निर्णय जाहीर करणे एका पक्षाच्या हाती नाही. काँग्रेसची उद्धव ठाकरेंशी चर्चा संजय राऊत म्हणाले की, दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी राज्यसभेच्या संदर्भात चर्चा केलेली आहे आणि वारंवार ही चर्चा सुरू आहे. काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन मुख्य नेत्यांनी उद्धव ठाकरेंशी चर्चा केली. तिन्ही पक्षामध्ये चर्चा आणि संवाद सुरू आहे. सर्व काही ठरवून केले जाईल. 3 पक्ष काही 3 उमेदवार उभे करणार नाही. एकच उमेदवार उभा राहील तो तिन्ही पक्षाचा असेल. मविआ म्हणून आम्ही ही जागा जिंकू, त्यात काहीही अडचण नाही. यासाठी मोदी-ट्रम्प जबाबदार असतील संजय राऊत म्हणाले की, कुणाच्या तरी सांगण्यावरुन आपण इराणवर हल्ला करत चूक केली असे ट्रम्प यांना वाटत असेल. इराण-इस्रायल युद्धामध्ये सर्वाधिक नुकसान हे अमेरिका आणि इस्रायलचे होताना दिसून येत आहे. इराण-इस्त्रायल युद्ध 4-5 आठवड्यांपेक्षा जास्त चालू शकते, ते 1 वर्षांपेक्षा जास्त काळ चालू शकते. इराणची जनता ही लढणारी आहे, ते मागे हटणार नाही. त्यांच्या जीवात जीव असेपर्यंत ते लढत राहतील. यामुळे हा युद्धाचे परिणाम सर्व जगाला भोगावे लागतील. यासाठी ट्रम्प आणि इस्त्रायल पंतप्रधान आणि भारताचे पंतप्रधान जबाबदार असतील. म्हणून युद्ध पुकारले अमेरिका आणि इराण यांच्यात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीवर संजय राऊत यांनी अत्यंत गंभीर आणि खळबळजनक विधान केले आहे. अमेरिकेने इराणविरुद्ध पुकारलेले हे युद्ध म्हणजे ‘एपस्टीन फाइल्स’मधील धक्कादायक माहितीवरून जगाचे लक्ष वळवण्याचा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. सध्या जागतिक स्तरावर ‘एपस्टीन फाइल्स’ची मोठी चर्चा सुरू आहे. या फाइल्समधून अनेक बड्या राष्ट्रप्रमुखांची आणि प्रभावशाली व्यक्तींची नावे समोर येत असून, त्यामुळे गंभीर माहिती उघड होत आहे. या प्रकरणातून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी काही राष्ट्रप्रमुखांनी संगनमताने युद्धाचे वातावरण तयार केले आहे, असे राऊतांनी म्हटले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर