ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

सूर्या धरणग्रस्तांचा 45 वर्षांचा वनवास संपला!:205 प्रकल्पग्रस्तांना महिनाभरात मिळणार जमिनीचा मालकी हक्क, महसूलमंत्र्यांची घोषणा

4 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पालघर जिल्ह्यातील सूर्या धरण प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या चंद्रानगर आणि हनुमाननगर येथील आदिवासी बांधवांचा तब्बल 45 वर्षांचा वनवास आता संपणार असून त्यांना जमिनीचा मालकी हक्क मिळणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत यासंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा करताना सांगितले की, पुढील एका महिन्याच्या आत उर्वरित सर्व 205 प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना सात-बारा उतारे आणि जमिनीच्या नकाशांचे अधिकृत वाटप करण्यात येईल. गेली साडेचार दशके जमिनीच्या प्रतीक्षेत असलेल्या या धरणग्रस्त आदिवासी कुटुंबांना सरकारच्या या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला असून, त्यांच्या संघर्षाला अखेर यश आले आहे. पालघर जिल्ह्यातील सूर्या धरण प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या 11 गावांतील प्रकल्पग्रस्तांच्या 45 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांकडे आमदार राजेंद्र गावित यांनी विधानसभेत लक्ष वेधले. चंद्रनगर आणि हनुमाननगर या दोन गावांतील रहिवाशांचे पुनर्वसन झाले असले तरी, अद्याप अनेक शेतकऱ्यांना सातबारा उतारे, गाव नकाशे, चतुर्सीमा आणि जमिनीचा मोबदला मिळाला नसल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. विशेष म्हणजे, मालकी हक्काचे सातबारा उतारे नसतानाही या भागातील जमिनी वाढवण बंदर आणि बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी संपादित करण्यात आल्याकडे त्यांनी सरकारचे लक्ष वेधले. या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना हक्काचे सातबारा उतारे आणि प्रलंबित मोबदला नेमका कधी मिळणार, असा सवाल करत त्यांनी प्रशासकीय दिरंगाईवर ताशेरे ओढले. यावर बोलताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, या प्रकरणात एकूण 467 खातेदार आहेत. त्यापैकी 262 खातेदारांना सातबारा उतारे आधीच देण्यात आले असून उर्वरित सुमारे 200 हून अधिक शेतकरी अद्याप बाकी आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या भागात जमिनींचे स्पष्ट सीमांकन झालेले नसल्यामुळे काही ठिकाणी क्षेत्रफळात बदल झाले आहेत. काही शेतकऱ्यांच्या जमिनी इतरांच्या क्षेत्रात गेल्या आहेत, तर काही ठिकाणी अतिक्रमणाच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे सर्व जमिनींचे पुन्हा सीमांकन करून अचूक नकाशे तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली. पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, नकाशे तयार करण्याचे काम पूर्ण करून उर्वरित शेतकऱ्यांना महिनाभराच्या आत सातबारा उतारे व संबंधित नकाशे देण्यात येतील. त्यानंतर ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी वाढवण बंदर आणि बुलेट ट्रेन प्रकल्पात संपादित झाल्या आहेत, त्यांना त्यांचा मोबदला देण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात येईल. या प्रक्रियेमुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागेल, असेही त्यांनी म्हटले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर