ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

प्रशासकीय यंत्रणा जनतेच्या दारी; मार्डी येथील ‘महाराजस्व’ शिबिरात २१०४ लाभार्थ्यांचा महाकुंभ!

4 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

महसूल, आरोग्य आणि कृषी विभागाच्या योजनांचा एकाच छताखाली लाभ; तहसीलदार उत्तम निलावाड यांचा पुढाकार

सुरेश पाचभाई मारेगाव,

मारेगाव तालुक्यातील मार्डी येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महा राजस्व अभियाना’अंतर्गत आयोजित महाराजस्व समाधान शिबिराने प्रशासकीय गतीमानतेचा नवा वस्तुपाठ घालून दिला आहे. त्रिमूर्ती मंगल कार्यालयात रंगलेल्या या शिबिरात तब्बल २१०४ नागरिकांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घेत आपल्या प्रलंबित समस्यांचे निराकरण करून घेतले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार उत्तम निलावाड होते. यावेळी प्रामुख्याने बीडीओ भीमराव व्हनखंडे, सहा. बीडीओ हेमराज राठोड, तालुका कृषी अधिकारी दिपाली खवले, वैद्यकीय अधिकारी संजय मडावी, भूमी अभिलेख उपअधीक्षक जाधव, नायब तहसीलदार विजय मत्ते यांची उपस्थिती होती.

एकाच ठिकाणी सर्व सेवांचा पाऊस
नागरिकांच्या महसूल विषयक तक्रारींचे जागेवरच निवारण करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली होती. शिबिरात डिजिटल स्वाक्षरीचे ७/१२, ८-अ उतारे, फेरफार दुरुस्ती, उत्पन्न आणि जातीचे प्रमाणपत्र अशा सेवा तत्काळ उपलब्ध करून देण्यात आल्या. विशेष म्हणजे, आरोग्य विभागाच्या स्टॉलवर सर्वाधिक १२७५ नागरिकांनी तपासणी करून लाभ घेतला.

निराधार आणि दिव्यांगांना दिलासा
या शिबिराचे मुख्य आकर्षण म्हणजे दिव्यांग आणि निराधार व्यक्तींना मिळालेला आधार. घरकुल लाभार्थ्यांना हक्काच्या रेतीचे पास वाटप करण्यात आल्याने सामान्यांच्या चेहऱ्यावर समाधान ओसंडून वाहत होते.

यावेळी भाजप तालुकाध्यक्ष अविनाश लांबट, शिवसेना (उबाठा) तालुका प्रमुख पुरुषोत्तम बुटे, माजी जि.प. सदस्या अरुणाताई खंडाळकर, उपसरपंच शोभा कालर यांच्यासह महसूल व पंचायत समितीचे अधिकारी-कर्मचारी व पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन आर. डी. कंडाळकर यांनी केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर